Home /News /national /

गर्लफ्रेंडसाठी तरुणाने घेतली चंद्रावर जमीन, आता बघतोय अंतराळात जाण्याचं स्वप्न

गर्लफ्रेंडसाठी तरुणाने घेतली चंद्रावर जमीन, आता बघतोय अंतराळात जाण्याचं स्वप्न

गेल्या काही वर्षांपासून एका मुलीच्या तो प्रेमात आहे आणि तिच्याशी लग्न करणार असल्याचंही त्याने जाहीर केलंय. तिला अनोखी भेट देण्यासाठी त्याने ही खेरदी केलीय.

    पाटना 13 जुलै: प्रेमात वेडे झालेले लोक केव्हा काय करतील याचा काही नेम नाही. प्रेमात बुडून गेलेल्या बिहारमधल्या एका तरुणाने प्रेयसीसाठी चक्क चंद्रावरच जमीन घेतल्याचा दावा केला आहे. हा तरुण प्रॉपर्टी डिलर आहे. आपल्या होणाऱ्या पत्नीसाठी चंद्र तोडून आणू शकत नाही मात्र तिच्यासाठी चंद्रावर जमीन घेतली असं तो सांगतो आहे. आपली जागा पाहण्यासाठी त्याला आता चंद्रावर जाण्याची स्वप्न पडत आहेत. नीरज गिरी (Neeraj Giri) असं या तरुणाचं नाव आहे. बोधगया जवळच्या बसतपूर इथ तो राहतो. गेल्या काही वर्षांपासून एका मुलीच्या तो प्रेमात आहे आणि तिच्याशी लग्न करणार असल्याचंही त्याने जाहीर केलंय. मात्र लग्नाच्या आधी तिला काही अनोखी भेट द्यायची त्याची इच्छा होती. त्याचवेळी त्याला ही योजना दिसली. गेल्या दोन वर्षांपासून त्याने प्रयत्न केल्याचा दावा तो करतो आहे. नुकतच आपल्याला त्याची कागदपत्रंही मिळालीत असा दावा त्याने केलाय. अंतराळात जाऊन आपली जमीन बघायची असं त्याचं स्वप्न आहे. कोरोना रुग्णांसाठी असे झटतात कोरोना योद्धा; PHOTO पाहून डॉक्टरांना सॅल्युट कराल चंद्रावर जमीन घेतल्याचा दावा देशात अनेकांनी केला आहे. असा दावा करणं हे फक्त आभासी असून अशी जमीन कोणीही खरेदी करू शकत नाही आणि विकतही देऊ शकत नाही. 1967मध्ये भारताने जगातल्या 104 देशांसोबत एका करारावर हस्ताक्षर केले आहेत. त्यानुसार चंद्र किंवा अवकाशातल्या कुठल्याही ग्रहावर कुणीही आपला अधिकार सांगू शकत नाही. मात्र जगभरात अनेक लोक आणि संस्था प्रसिद्धी मिळविण्यासाठी असे सवंग दावे करत असतात.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या