असं काय झालं की गौतम गंभीर मुख्यमंत्र्यांना म्हणाला ‘बाबूजी धीरे चलना!’

असं काय झालं की गौतम गंभीर मुख्यमंत्र्यांना म्हणाला ‘बाबूजी धीरे चलना!’

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या गौतम गंभीरनं मुख्यमंत्र्यांवर केली टीका.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर : भाजपचा खासदार आणि माजी क्रिकेटर गौतम गंभीर नेहमीच आपल्या उपरोधिक टीकांमुळे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. मात्र आता गंभीर मुख्यमंत्र्यांवर टीका करताना एक गाणं ट्विटरवर म्हटले आहे.

गौतम गंभीरनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवला यांच्यावर रस्त्यांवर खड्डे असल्यामुळं एका गाण्यावरून टीका केली आहे. गंभीरनं 1954मध्ये आलेल्या गीता दत्त यांच्या ‘बाबू जी धीरे चलना’ या गाण्यात बदल करत ‘बड्डे खड्डे हे इस रास्त में!’, अशी टीका केली आहे. गंभीरनं गाण्यांच्या माध्यमातून केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. गंभीरनं ही टीका केजरीवाल यांनी सरकारचा एक निर्णय जाहीर केला, त्यानंतर केली. केजरीवाल यांच्या सरकारनं पीडल्बूडीच्या वतीनं दिल्लीतील ज्या रस्त्यांवर सर्वात जास्त ट्रॅफिक आहे, त्या रस्त्यांची तपासणी करण्यात यावी. सर्व 50 आमदार 20-25 किमीपर्यंत रस्त्यांची पाहणी करत फोटो काढतील, असे जाहीर केले होते. यावर गंभीरनं त्यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान या सगळ्या प्रकरणावरून खासदार गौतम गंभीर आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात वादंग सुरू झाला आहे. केजरीवाल यांनी रस्त्यांबाबत अभियान जाहीर करताच, गंभीरनं या सगळ्यावर रस्त्यांवर खड्डे आहेत त्यावर लक्ष द्या, अशी उपरोधित टीका गाण्याच्या माध्यमातून केली आहे. तसेच, दिल्लीची परिस्थिती सर्वांना माहित आहे, असे असताना सर्वांन खुश करण्यासाठी तुम्ही आणलेली योजना उत्तम आहे, अशी टीका केली आहे.

विधानसभा निवडणूकांआधी नव्या अभियानाची सुरुवात केली होती. यात रस्त्यांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. 2015मध्ये विधानसभा निवडणूकीत आम आदमी पक्षानं भाजप आणि कॉंग्रेसचा सुपडासाफ केला. यात आम आदमी पक्षानं लोकांना दिलेले आवाहन पूर्ण केले.

VIDEO: निवडणुकीच्या रणधुमाळीत नवरात्राची धूम, गरब्यामध्ये मोदीच मोदी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2019 06:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading