गौतम गंभीरची आता भाजपसाठी बॅटींग, अरुण जेटलींच्या उपस्थितीत प्रवेश

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश

News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2019 12:39 PM IST

गौतम गंभीरची आता भाजपसाठी बॅटींग, अरुण जेटलींच्या उपस्थितीत प्रवेश

नवी दिल्ली, 22 मार्च : भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने भाजपमध्ये प्रवेश केला. नवी दिल्लीत त्याने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींच्या उपस्थितीत त्याने प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून गंभीरच्या राजकारण प्रवेशाची चर्चा सुरू होती.लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने आता उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. भाजपने 184 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर पुढच्या यादीत दिल्लीतील 3 उमेदवार बदलण्याची शक्यता आहे.


Loading...


दिल्लीतील सध्याच्या खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर दिल्लीतून लढण्याची शक्यता आहे.

गौतम गंभीर सोशल मीडियावर अॅक्टिव असतो. त्याने आतापर्यंत दिल्लीतील आप सरकारवर अनेकदा टीका केली आहे.

VIDEO : सुर्यमुखी कार्यकर्त्यांनो, अजित पवारांनी टोचले कान


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2019 12:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...