दोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक

दोन वर्ल्ड जिंकून देणारा ‘हा’ फलंदाज लढणार लोकसभेची निवडणूक

भारतीय क्रिकेट संघाला टी-20 आणि आयसीसी वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा माजी फलंदाज गौतम गंभीर याची लवकरच राजकारणात एन्ट्री होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 जानेवारी: भारतीय क्रिकेट संघाला टी-20 आणि आयसीसी वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा माजी फलंदाज गौतम गंभीर याची लवकरच राजकारणात एन्ट्री होण्याची शक्यता आहे. क्रिकेटच्या मैदानावर आक्रमक फलंदाज अशी ओळख असलेला गंभीर सोशल मीडियावर त्याची रोखठोक मते मांडत असतो. ट्विटवरील पोस्टमुळे गंभीर अनेक वेळा चर्चेत आला आहे. आता पुन्हा एकदा गंभीरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. यावेळी गंभीरने थेट राजकीय हल्ला चढवला आहे.

देशात शनिवारी एका बाजूला कोलकात्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षांची सभा घेतली होती. तर दुसऱ्या बाजूला मोदींनी मुंबईतील एका कार्यक्रमात विरोधकांवर हल्ला चढवला. या दोन राजकीय घडामोडीत गंभीरने दिल्लीच्या राजकारणाची दशा आणि दिशा यावर जोरदार टीका केली.

गंभीरने ट्विटवर, 'मैं दिल्ली हूं. ललचाई आंखों से सहमी मैं दिल्ली हूं. फुटपाथों पर ठंड में सिकुड़ती मैं दिल्ली हूं. अस्पतालों में रेंगती मैं दिल्ली हूं. सिस्टम से झगड़ती मैं दिल्ली हूं. कड़वी हवा में सांसे गिनती मैं दिल्ली हूं. मफलर, गेरुएय और खादी के बीच अपने नंगेपन को छुपाती मैं दिल्ली हूं.' ही पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाना साधला. अर्थात गंभीरने याआधी देखील दिल्लीतील ‘आप’ सरकावर टीका केली आहे.

गंभीर हा भाजप समर्थक असल्याचे मानले जाते. पण दिल्लीतील सध्याच्या स्थितीवर टीका करताना त्याने आम आदमी पक्ष, काँग्रेससह भाजपवर देखील टीका केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गंभीर आगामी लोकसभा निवडणुकीत दिल्लीतून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी राजधानीतील 7 पैकी कोणत्याही एका मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा सल्ला दिल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी दिल्ली क्रिकेट बोर्डावर सरकारचा प्रतिनिधी म्हणून गंभीरची निवड करण्यात आली होती. त्यामुळेच गंभीरने केलेल्या या ट्विटकडे त्याच्या राजकीय प्रवेशाची सुरुवात असल्याचे मानले जात आहे.

First published: January 20, 2019, 3:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading