जनवी दिल्ली 04 ऑक्टोबर: हाथरसला जाताना काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश सीमेवर अडविण्यात आलं होतं. तिथे कार्यकर्त्यांच्या बचावासाठी जाताना प्रियंका गांधी यांना धक्काबुक्कीही झाली होती. एका पोलिसाने त्यांचा कुर्ता हातात धरला असा फोटोही व्हायरल झाला होता. त्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर गौतबुद्ध नगर पोलिसांनी त्या घटनेबद्दल प्रियंका गांधी यांची माफी मागितली आहे. त्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
शनिवारी दिल्लीतून दुपारी राहुल आणि प्रियंका गांधी उत्तर प्रदेशकडे निघाले होते. प्रियंका या स्वत: ड्रायव्हिंग करत निघाल्या होत्या. उत्तर प्रदेश सीमेवर पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा जमाव जमला होता. त्यांना पांगविण्यासाठी पोलीस बळचा वापर करत होते. त्यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांची धक्काबुक्कीही झाली.
ती धक्काबुक्की होत असताना प्रियंका गांधी यांचं लक्ष कार्यकर्त्यांकडे गेलं. पोलीस त्यांना रेटत असल्याचं पाहून त्या वेगाने पुढे आल्यात आणि बॅरेकेट्स ओलांडत त्यांनी कार्यकर्त्यांचा बचाव केला. दोन दिवसांपूर्वी राहुल गांधीही पोलिसांच्या रेट्यात खाली कोसळले होते.
रॉबर्ट वाड्रा काय म्हणाले?
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांची हाथरस भेट चांगलीच गाजली आहे. पीडित मुलीच्या आईने प्रियंका यांना बिलगून टाहो फोडला होता. ते फोटो आणि VIDEO सोशल माध्यमांवरही चांगलेच गाजले आहेत. पोलिसांनी प्रियंका गांधी यांच्याशी जे वर्तन केले त्यावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रियंका यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी भावूक ट्विट करत प्रियंका यांच्या दौऱ्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Gautam Buddh Nagar police apologises to Priyanka Gandhi Vadra, says it has ordered inquiry into policeman holding Congress leader by her kurta during ruckus at DND flyover
— Press Trust of India (@PTI_News) October 4, 2020
प्रियंका तुझा अभिमान आहे. देशातल्या दु:खी लोकांना न्याय द्यायचा असेल तर हाच ऐकमेव मार्ग आहे. मला आणि सर्व कुटुंबीयांना तुझी आणि देशातल्या लोकांची काळजी वाटते. पण असे अत्याचार रोखण्यासाठी आघाडीवरच जावून लढले पाहिजे असंही वाड्रा यांनी म्हटलं आहे.