गौरी लंकेश हत्या प्रकरण: कर्नाटक सरकारने दिले एसआयटी चौकशीचे आदेश

गौरी लंकेश हत्या प्रकरण: कर्नाटक सरकारने दिले एसआयटी चौकशीचे आदेश

हत्येच्या तपासासाठी 3 पथकं तयार आहेत. बंगळुरूमध्ये व्हिक्टोरिया रुग्णालयात गौरी लंकेश यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरु आहे.

  • Share this:

बंगळुरू,06 सप्टेंबर: ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा देशभरातून  निषेध करण्यात येतोय. दरम्यान या प्रकरणी कर्नाटक सरकारने दिले एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक बोलावली होती.

कर्नाटक राज्य सरकारकडून हत्येची गंभीर दखल घेण्यात आली आहे. हत्येच्या तपासासाठी 3 पथकं तयार आहेत. बंगळुरूमध्ये व्हिक्टोरिया रुग्णालयात गौरी लंकेश यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरु आहे. शरीरात 2 गोळ्या असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हत्येच्या वेळी घटनास्थळावरचे स्ट्रीट लाईट बंद होते हे ही कळते आहे.

पोलीस सहआयुक्त सतीश हे या हत्या प्रकरणाचा तपास घेत आहेत.

First Published: Sep 6, 2017 12:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading