कोल्हापूर, 16 सप्टेंबर : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी कर्नाटकचे पोलीस कोल्हापुरात दाखल झालेत. कॉम्रेड गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांमध्ये काही साधर्म्य आढळून आल्याने पोलीस त्याअनुशंगानेही तपास करताहेत. या दोन्ही हत्यांमध्ये वापरलं गेलेलं पिस्तुल हे जवळपास एकसारखच असल्याचं कळतंय. तसंच पानसरे आणि गौरी लंकेश हे दोघेही कट्टर हिंदुत्ववाद्यांविरोधात लिखान करत होते. त्यामुळे या दोघांच्या हत्यांमध्ये हा एक समान दुवा तर नाहीना याचाही पोलीस तपासताहेत.
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉग्रेड गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश या चारही हत्यांमधील साधर्म्याची एकत्रित तपास करण्याची मागणी होतेय. त्याच पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलीस कोल्हापूरात दाखल झालेत. कर्नाटक पोलिसांनी कोल्हापूर पोलिसांकडून पानसरे हत्याप्रकरणासंबंधी बरीचशी माहिती घेतलीय. मात्र कोल्हापूर पोलिसांनी यासंबंधी अधिक माहिती देण्यास नकार दिलाय.
गेल्या 4 सप्टेंबरलाच गौरी लंकेश यांची बंगळुरूत त्यांच्या राहत्या घरासमोरच अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केलीय. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश चारही विचारवंतांचे मारेकरी अजूनही मोकाटच आहेत. त्यामुळे विवेकवादी चळवळीतून मोठा संताप व्यक्त होतोय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा