'अमोल काळे सहकाऱ्यांना द्यायचा शॉक', गौरी लंकेश हत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा

'अमोल काळे सहकाऱ्यांना द्यायचा शॉक', गौरी लंकेश हत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी आता कर्नाटक SITने धक्कादायक माहिती उघड केली आहे. आरोपी अमोल काळे हा त्यांच्या सहकाऱ्यांना शॉक द्यायचा अशी माहिती कर्नाटक SIT च्या तपासात उघड झाली आहे.

  • Share this:

संदीप राजगोळकर, प्रतिनिधी

बंगळुरू, 12 जानेवारी : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी आता कर्नाटक SITने धक्कादायक माहिती उघड केली आहे.  आरोपी अमोल काळे हा त्यांच्या सहकाऱ्यांना शॉक द्यायचा अशी माहिती कर्नाटक SIT च्या तपासात उघड झाली आहे.

पोलिसांचा त्रास सहन करण्याची तयारी व्हावी यासाठी तो त्याच्या सहकाऱ्यांना शॉक द्यायचा असा खुलासा एसआयीटीने केला आहे. इलेक्टरीक शॉक देऊन तो त्यांची मानसिक शारीरिक तयारी करायचा. पोलिसांचा त्रास रोखण्यासाठी तो त्याच्या सहकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण द्यायचा. अनेक सहकाऱ्यांनी शॉक दिल्याचं मान्य केलं असल्याची माहिती कर्नाटक SITकडून देण्यात आली आहे.

काळे यानेच सगळ्यांना बॉम्ब बनवायला शिकवलं. त्याचबरोबर शरद कळसकर आणि अमोल यांनी त्यांना प्रशिक्षण दिलं असंही SITच्या तपासात समोर आलं आहे.

दाभोलकर खून प्रकरणी सीबीआयचा हलगर्जीपणा, 'या' 3 आरोपींना जामीन!

गेल्या काही दिवसांआधी पुणे कोर्टानं या तीन आरोपींना जामीन दिला होता. 90 दिवसांत आरोपपत्र दाखल करायचं असतं, पण सीबीआयला तेही करणं जमलं नाही.

अमोल काळे, अमित देगवेकर आणि राजेश बांगेरा यांच्यावर यूएपीए लावला होता. त्यामुळे सीबीआयने आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मागणं अपेक्षित होतं पण ती मागितली नाही आणि 90 दिवस अटकेला उलटून गेल्यामुळे डिफॉल्ट बेल मिळाला होता.

हे तिन्ही आरोपींची गौरी लंकेश हत्येप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. याचा ताबा कर्नाटक एटीएसकडे आहे. दाभोलकर खून प्रकरणात या तिघांची चौकशी करण्यासाठी त्यांचा ताबा सीबीआयला देण्यात आला होता. या तिघांचा कर्नाटक पोलिसांकडे ताबा आहे. परंतु, सीबीआयकडे पुढील 90 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करणे गरजेचं होतं. पण तसा सीबीआयकडून कोणताही प्रयत्न झाला नाही त्यामुळे या तिघांना दाभोलकर प्रकरणात जामीन मिळाला होता.

या तिघांना जामीन जरी मिळाला असला तरी गौरी लंकेश हत्या प्रकरणात या तिघांचाही ताबा कर्नाटक पोलिसांकडे आहे.

BREAKING : 'या' एका जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये वाद

First published: January 12, 2019, 11:50 AM IST

ताज्या बातम्या