गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांची रेखाचित्र प्रसिद्ध

गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांची रेखाचित्र प्रसिद्ध

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील तपासाला आता कुठे वेग आलाय. बंगळुरू पोलिसांनी या संशयित मारेकऱ्यांची रेखाचित्र जारी केलीत

  • Share this:

बंगळुरू , 14 ऑक्टोबर : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील तपासाला आता कुठे वेग आलाय. बंगळुरू पोलिसांनी या संशयित मारेकऱ्यांची रेखाचित्र जारी केलीत. बंगळुरू पोलिसांच्या एसआयटी पथकाने तीन संशयितांची रेखाचित्र प्रसिद्ध केलीत. आरोपींना शोधण्यासाठी लोकांनी मदत करण्याचं आवाहनही पोलिसांनी केलंय.

गौरी लंकेश यांची गेल्या महिन्यात त्यांच्या राहत्या घरी गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. त्यांचे मारेकरी अजूनही मोकाटच आहेत. त्याविरोधात विवेकवादी चळवळीतून तीव्र संपात व्यक्त होतोय. डॉ. दाभोलकर, पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्यानंतर ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांचीही हत्या करण्यात आलीय. हे चारही विचारवंत कट्टरवाद्यांच्या लिखाण करत होते. विवेकवादी चळवळीचा आवाज दडपून टाकण्यासाठीच या चौघांची हत्या केल्याचा आरोप होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2017 12:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading