Home /News /national /

भीषण दुर्घटना, यूरिया बनवणाऱ्या कंपनीत गॅस गळती, 2 अधिकाऱ्यांचा मृत्यू

भीषण दुर्घटना, यूरिया बनवणाऱ्या कंपनीत गॅस गळती, 2 अधिकाऱ्यांचा मृत्यू

इफको कंपनीमध्ये अचानक अमोनिया गॅसची गळती झाली. या दुर्घटनेत 2 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

    प्रयागराज, 23 डिसेंबर : उत्तरप्रदेशमधील प्रयागराज इथं यूरिया (Urea) तयार करणाऱ्या इफको कंपनीमध्ये अचानक अमोनिया गॅसची गळती झाली. या दुर्घटनेत 2 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 24 कर्मचारी जखमी झाले आहे. यात 14 जणांचा प्रकृती गंभीर आहे. सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रयागराज येथील यूरिया तयार करणाऱ्या इफको कंपनीमध्ये (Indian Farmers and Fertilizer Cooperative Limited) मंगळवारी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रात्रपाळीला अधिकारी आणि कर्मचारी कामावर हजर झाले होते. अचानक प्लांटमध्ये अमोनिया गॅसची मोठ्या प्रमाणात गळती झाली. काही कर्मचाऱ्यांनी बाहेर धाव घेतली. मुंबईच्या रस्त्यांवर जाणवला नाईट कर्फ्यूचा परिणाम, पाहा PHOTOS पण, गॅस गळतीचे प्रमाण जास्त असल्यामुळे घटनास्थळावर 24 जण अडकले गेले. यात 2 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. तर 14 जण गंभीर जखमी झाले आहे. इफकोचे जनसंपर्क अधिकारी विश्वजीत यांनी दुर्घटनेला दुजोरा दिला असून 2 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. सहाय्यक व्यवस्थापक बीपी सिंह आणि डिप्टी मॅनेजर अभिनंदन असं मृत अधिकाऱ्यांची नावं आहे. या दुर्घटनेनंतर तातडीने यूरियाचे दोन्ही प्लांट बंद करण्यात आला आहे. मुळात हा प्लांट बंद होण्याच्या मार्गावर होता. त्यामुळे टाकी दुरस्त नसल्यामुळे गळती झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फक्त 6 घरगुती उपाय; हिवाळ्यातही टवटवीत राहिल त्वचा धक्कादायक म्हणजे, मागील 2 वर्षांमध्ये 5 वेळा वायू गळतीची घटना या प्लांटमध्ये घडली होती. वारंवार गळती होत असताना सुद्धा दुरुस्ती का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.  शहरापासून अवघ्या 40 किमी अंतरावर इफकोची कंपनी आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलीस आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर  गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. गॅस गळतीची घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास पोलीस करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या