नवी दिल्ली, 01 जानेवारी : नव्या वर्षात सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत आजपासून वाढ होणार आहे. सलग चौथ्या महिन्यात गॅसच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामन्यांना मोठा दणका बसला आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये विना अनुदानित गॅसच्या किंमतीत 19 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
देशात वेगवेगळ्या शहरांमधील गॅस सिलिंडरच्या दरामध्ये फरक आहे. यात दिल्लीत विनाअनुदानित 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरसाठी 714 रुपये तर कोलकात्यात 747 रुपये आहे. मुंबईत 684 रुपये 50 पैसे तर चेन्नईमध्ये याच सिलिंडरसाठी 734 रुपये मोजावे लागणार आहेत. 19 किलो सिलिंडर गॅसची किंमत दिल्लीत 1241 रुपये इतकी आहे. कोलकात्यात 1308 तर मुंबई आणि चेन्नईत अनुक्रमे 1190 आणि 1363 रुपये इतकी आहे.
गेल्या महिन्यात दिल्लीत एका सिलिंडरसाठी 695 रुपये द्यावे लागत होते तर मुंबईत सर्वात कमी 665 रुपये मोजावे लागत होते. आता पुन्हा दर वाढल्यानं सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. गेल्या वर्षी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करून भेट दिली होती. तेव्हा विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमती 120 रुपये 50 पैशांनी कमी केल्या होत्या.
Published by:Suraj Yadav
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.