मराठी बातम्या /बातम्या /देश /

शहीद IAF पायलटची पत्नी एकाच वर्षात एयरफोर्समध्ये सामील, फ्लाईंग ऑफिसर पदावर नियुक्ती

शहीद IAF पायलटची पत्नी एकाच वर्षात एयरफोर्समध्ये सामील, फ्लाईंग ऑफिसर पदावर नियुक्ती

देशेसेवेसाठी आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या शहीद स्क्वाड्रन लीडर समीर अबरोल (Squadron leader Samir Abrol) यांची पत्नी गरिमा अबरोलही (Garima Abrol) आता देशसेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. भारतीय वायूदलात (Indian Airforce) प्रवेश करण्याचा निश्चय केला होता आणि एका वर्षातच खडतर प्रशिक्षण पूर्ण करून त्या फ्लाईंग ऑफिसर बनल्या आहेत.

पुढे वाचा ...
हैदराबाद : देशेसेवेसाठी आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या शहीद स्क्वाड्रन लीडर समीर अबरोल (Squadron leader Samir Abrol) यांची पत्नी गरिमा अबरोलही (Garima Abrol) आता देशसेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. पतीच्या निधनाचं दुःख मनातच ठेवून त्यांनी आपणही देशसेवेसाठी भारतीय वायूदलात (Indian Airforce) प्रवेश करण्याचा निश्चय केला होता आणि एका वर्षातच खडतर प्रशिक्षण पूर्ण करून त्या फ्लाईंग ऑफिसर बनल्या आहेत. नावाप्रमाणेच अतिशय अभिमानास्पद कामगिरी गरिमा यांनी केली असून, अनेक महिलांसाठी त्या प्रेरणादायी ठरल्या आहेत. शनिवारी संरक्षण मंत्री राजनाथसिंह (Defence Minister Rajnath Singh) यांच्या उपस्थितीत हैदराबादच्या दिन्डीगल एअरफोर्स अॅकॅडमीमध्ये (Airforce Academy) झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये गरिमा अबरोल सहभागी झाल्या होत्या. या वेळी त्यांनी परिधान केलेला वायुसेनेचा पोशाख म्हणजे कमावलेली वर्दी त्यांनी आपले पती शहीद स्क्वाड्रन लीडर समीर अबरोल यांना अर्पण केली आहे. 2019 मध्ये बंगळूरू इथं हवाई दलाचं मिराज 2000 विमान (Mirage 2000 Aircraft) कोसळून झालेल्या अपघातात स्क्वाड्रन लीडर समीर अबरोल यांचा मृत्यू झाला होता. गरिमा आणि समीर यांचा 2015 मध्ये विवाह झाला होता, अवघ्या चार वर्षात त्यांचा संसार संपला. या वेळी गरिमा यांनी अतिशय भावूक पोस्ट लिहून आपल्या दुःखाला मोकळी वाट करून दिली होती, त्याचवेळी अशा धडाडीच्या अधिकाऱ्यांचा बळी घेणाऱ्या व्यवस्थेवरही ताशेरे ओढले होते. ‘किती वैमानिकांचा बळी गेल्यावर या व्यवस्थेतील लोकांना चुकीची जाणीव होणार आहे, अजून किती लोकांना आपला बळी द्यावा लागणार आहे, असा परखड सवाल त्यांनी विचारला होता. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं, माझे अश्रूदेखील अजून सुकले नाहीत. माझा विश्वासच बसत नाही की तू नाही आहेस. माझ्या प्रश्नांची कोणीही उत्तरे देत नाहीत. माझ्या पतीला भारतीय असल्याचा अभिमान होता.’ भारतीय असल्याचा नितांत अभिमान असलेल्या आपल्या पतीचा देशसेवेचा वसा पुढं चालवण्यासाठी गरिमा यांनी प्राणाचं मोल मागणाऱ्या याच काटेरी वाटेवरून जाण्याचा निर्णय घेतला. अवघ्या एका वर्षातच त्यांनी हे लक्ष्य साध्य केलं. शिलाँग इथल्या एअरफोर्स अॅकॅडमीमधून त्यांनी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केलं असून, त्या आता भारतीय वायूदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून रुजू झाल्याचं शिलाँगमधील संरक्षण दलाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी (Shilong Defence PRO) ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
First published:

पुढील बातम्या