'गरीब रथ' बंद करण्याचा मोदी सरकार निर्णय घेणार, हे आहे कारण

'गरीब रथ' बंद करण्याचा मोदी सरकार निर्णय घेणार, हे आहे कारण

'गरीब रथ' या गाड्यांच्या कोचेसचं उत्पादन बंद झाल्याने या गाड्यांचं रुपांतर करण्याचा रेल्वेचा विचार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 17 जुलै : स्वस्त तिकीट दर आणि संपूर्ण वातानुकूलीत गाडी असं वैशिष्ट्य असलेल्या रेल्वेच्या 'गरीब रथ' या गाड्या बंद होण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी सरकार याबाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. 'गरीब रथ'च्या कोचेसचं उत्पादन बंद झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं कारण दिलं जातेय. या गाड्यांचं रुपांतर रेल्वे आता मेल एक्सप्रेसमध्ये करण्याची शक्यता आहे.

युपीए सरकारच्या काळात 2006 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी 'गरीब रथ' गाड्या सुरू केल्या होत्या. वेगवान आणि वातानुकूलीत असलेल्या या गाड्यांचे दर इतर गाड्यांपेक्षा कमी असल्याने त्याला प्रतिसादही चांगला मिळाला होता. मात्र आता या गाड्यांच्या कोचेसची निर्मितीच बंद झाली आहे. त्यामुळे या गाड्यांचं रुपांतर मेल गाड्यांमध्ये करण्याची शक्यता आहे.

न्हाव्याने कापल्या युवा दणका संघटनेच्या अध्यक्षाच्या मिशा, नागपुरात गुन्हा दाखल

'गरीब रथ' या गाड्यांना 12 कोचेस आहेत. नव्या मेल गाड्यांना आता 16 कोचेस असणार असून त्यात जनरल, स्लिपर आणि एसी श्रेणीही असणार आहेत. 'गरीब रथ'च्या तुलनेत हा प्रवास थोडा महाग होण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय. 'गरीब रथा'मध्ये जेवण आणि बेड रोलसाठी वेगळे पैसे द्यावे लागत होते.  मात्र रेल्वेने याबाबत अजुन अधिकृतपणे काहीही जाहीर केलेलं नाही.

अमरावतीत कृषिमंत्र्यांच्या घरासमोर शेतकऱ्यांचे मुंडन, प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

पहली स्पेशल ट्रेन लवकरच धावणार

भारताची पहिली खासगी ट्रेन तेजस एक्स्प्रेस लवकरच धावणार आहे. पहिल्यांदा ही ट्रेन लखनऊ आणि नवी दिल्लीच्या मधे चालवली जाईल. भारतीय रेल्वेनं ट्रायल म्हणून ही ट्रेन आयआरसीटीसीला द्यायचा निर्णय घेतलाय. या ट्रेनमध्ये आधुनिक सुविधा असतील. आरामदायी सीट्स, एलईडी लाइट, बायो टाॅयलेट, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि मेट्रो ट्रेनसारखे आपोआप उघडणारे दरवाजे अशा सुविधा ट्रेनमध्ये असतील.

रेल्वेच्या खासगीकरणाबद्दल बरेच दिवस चर्चा सुरू आहे. आता असं म्हणतात देशात पहिली खासगी ट्रेन दिल्ली ते लखनऊच्या मध्ये धावणार आहे.

First published: July 17, 2019, 7:23 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading