गार्गी कॉलेज सामूहिक विनयभंग, तो तरुण विद्यार्थिनींसमोर करीत होता हस्तमैथुन, वाचा ग्राऊंड रिपोर्ट

गार्गी कॉलेज सामूहिक विनयभंग, तो तरुण विद्यार्थिनींसमोर करीत होता हस्तमैथुन, वाचा ग्राऊंड रिपोर्ट

गैरवर्तणूक करणारे ते तरुण 'जय श्री राम'चा नारा देत असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : दिल्लीतील गार्गी कॉलेजमधील सामूहिक विनयभंगाच्या त्या थरकाप उडविणाऱ्या प्रसंगाबाबत विद्यार्थिनी समाज माध्यमावर व्यक्त झाल्या. त्यांच्यावर ओढवलेली परिस्थिती समाज माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचली. काल सोमवारी येथील विद्यार्थिनींनी कॉलेज व्यवस्थापनाविरोधात आंदोलन छेडले. आणि या प्रकरणाची प्रामाणिक आणि खोल चौकशी करण्याची मागणी केली. याशिवाय विद्यार्थिनींनी प्राचार्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

फेब्रुवारीच्या 6 तारखेला दिल्लीच्या गार्गी महिला कॉलेजमध्ये फेस्टचं आयोजन करण्य़ात आलं होतं. यावेळी झुबिन न्यूतियाल या प्रसिद्ध गायकाचा शो असल्याने सर्वांमध्ये उत्सुकता होती. मात्र या दिवशी त्यांच्यासोबत झालेली वागणूक माणूसकीला काळीमा फासणारी आहे. कॉलेजचे फेस्ट सुरू असताना अचानक गेट तोडून 100 हून अधिक तरुण आत शिरले. गार्गी हे गर्ल्स कॉलेज असल्याने पुरुषाने येथे येण्यापूर्वी पास बनविणे अनिवार्य आहे. मात्र ते तरुण आधार, पॅन आणि मेट्रो कार्ड घेऊन आत आले. यातील अनेकजण Pro-CAA रॅलीतील होते. काहीजण तर ‘जय श्री राम’चा नारा देत होते, अशी माहिती त्या फेस्टमध्ये उपस्थित असलेल्या एका विद्यार्थिनीने दिली. पाहता पाहता ते मुलींच्या घोळक्यात शिरले. ते विद्यार्थिनींवर अश्लिल कमेंट करीत होते. त्यांच्या शरीराला स्पर्श करीत होते. त्यातील काही रिकाम्या स्टॉलच्या टेबलावर उभे राहिले आणि जोरजोराने ओरडू लागले. 'जी मुलगी मला ‘पटेल’ तिला 50 हजारांचं मेकअप किट देईन', असे म्हणताना ते विद्यार्थिनींच्या दिशेने खूण करीत होते. यावेळी CRPF आणि दिल्ली पोलीस कॅम्पनमध्ये तैनात होते. एका विद्यार्थिनीने तिच्यासोबत घडलेला अश्लिल प्रकार सांगितला. एक ग्रुप माझ्या मागे उभा होता. काहींनी आमच्या पार्श्वभागाला स्पर्श केला, आम्ही मागे वळलो तोपर्यंत ते तरुण गर्दीमधून निघून गेले. हे अत्यंत घृणास्पद होतं. या घटनेनंतर आम्ही तेथून निघून गेलो. नंतर आम्हाला कळाले की अशा घटना अनेक मुलींसोबत घडल्या आहेत. काही विद्यार्थिनींनी सांगितले की, ते तरुण कंबरेत हात घातल होते. हा प्रकार सुरू असतानादेखील महाविद्यालयीन कर्मचारी आणि पोलीस मदतीसाठी आले नाहीत. ते म्हणाले की, तुम्हाला खूप असुरक्षित वाटत असेल तर कॉलेजमध्ये का येता, कॉलेज फेस्टला का येता? यावेळी एक तरुण विद्यार्थिनींसमोर हस्तमैथूनही करीत असल्याची धक्कादायब बाब विद्यार्थिनींनी सांगितली. जोपर्यंत कॉलेज प्रश्नासन व कॉलेजचे सुरक्षा अधिकारी यांच्याकडून स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत वर्गात हजर राहणार नसल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. कॉलेज प्रशासन या प्रकारावर कधी कारवाई करणार याबाबतही आम्हाला माहिती द्यावी, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली आहे.

 

First published: February 11, 2020, 12:35 PM IST

ताज्या बातम्या