LIVE NOW

Ganpati Visarjan 2018 Live : पुढच्या वर्षी लवकर या..

सुमुख, एकदन्त, कपिल, गजकर्णक, लम्बोदर, विकट, विघ्ननाश, विनायश, विनायक, धूम्रकेतु, गणाध्यक्ष, भालचन्द्र गजानन अशा आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा क्षण आलाय. अख्ख राज्य आज हळव्या मनाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहे. दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर गणराया आज गावाकडे निघालाय. सगळ्यांच्या मुखी आता एकच प्रार्थना आहे 'पुढच्या वर्षी लवकर या.' गणेशभक्तांमध्ये बाप्पाला निरोप देताना भावूक झाले असले तरी काहीसे आनंदीही आहे आणि राज्यातील विसर्जनासोबत पुण्यातल्या मानाच्या गणपतींसह मुख्य विसर्जन मिरवणुकीचं थेट लाईव्ह प्रेक्षपणही तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

Lokmat.news18.com | September 23, 2018, 11:15 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated September 23, 2018
auto-refresh

Highlights

7:19 pm (IST)

कोकणात पारंपरिक वाद्यच्या गजरात बापाला निरोप 
डीजे ऐवजी ढाक्यू---माक्युम... ढाक्यू---माक्युम...चा पर्याय निवडत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीकरांनी बाप्पाला निरोप दिला. पारंपरिक वाद्याच्या गजरात बाप्पाला निरोप देताना अवघं दोपाली शहर दणाणून गेलं होतं. पुणे-मुंबई सारख्या मोठ्या शहरातील गणेश मंडळे कोर्टाच्या मनाई आदेशावर अडून बसली आहेत. त्यामुळे डीजे वाद्यांवर एकीकडे  वाद निर्माण झाला आहे . परंतु याचा कोकणात कोणताही परिणाम जाणवला नाही. उलट डीजे शिवाय लोकांनी पारंपरिक वाद्याच्या गजरात बाप्पा ला निरोप देण्याला भक्तांनी पसंती दिली .


Load More
सुमुख, एकदन्त, कपिल, गजकर्णक, लम्बोदर, विकट, विघ्ननाश, विनायश, विनायक, धूम्रकेतु, गणाध्यक्ष, भालचन्द्र गजानन अशा आपल्या लाडक्या बाप्पाला सर्व गणेश भक्तांनी रविवारी निरोप दिला. पुढच्या वर्षी लवकर या... असे म्हणत मुंबई आणि पुण्यासह राज्यात ठिकठिकाणी बाप्पाचे जल्लोषात विसर्जन करण्यात आले. डीजेवर बंदी असल्यामुळे जवळपास सर्वच गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीदरम्यान ढोल-ताशा आणि पारंपारिक वाद्यांना प्राधान्य देत बाप्पाला निरोप दिला. मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर आणि जुहू चौपाटीवर सकाळपासूनच गणेश भक्तांनी विसर्जनासाठी गर्दी केली होती. लाल बागच्या राजालाही निरोप देण्यासाठी मुंबईत भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली आहे. सोमवारी सकाळी गिरगाव चौपाटीवर लाल बागच्या राजाचे विसर्जन होईल. तर पुण्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही मानाच्या पाच गणपतींचे सायंकाळी ७ पर्यंत विसर्जन आटोपले होते. इतर मंडळांनी विसर्जनासाठी काढलेली मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सद्या दगडूशेठच्या गणपतीची मार्गक्रमण करत असून, डीजेवर अडून बसलेल्बाया पुणेकरांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी अखेरिस ढोल-ताशांचा जगर केल्याने पुण्यात चैतन्यमय वातावरण आहे. पुण्यातला मानाचा पहिला गणपती - कसबा गणपतीचं 4 वाजून 1। मिनिटांनी झालं विसर्जन झालं. तर मानाचा दुसरा गणपती - तांबडी जोगेश्वरीचं 5 वाजून 10 मिनिटांनी, मानाचा तिसरा गणपती - गुरुजी तालीमगणपतीचं 5 वाजून 33 मिनिटांनी, मानाचा चौथा गणपती - तुळशीबाग गणपतीचं 6 वाजून 28 मिनिटांनी आणि मानाचा पाचवा गणपती - केसरीवाडा गणपतीचं सायंकाळी 7 वाजून 8 मिनिटांनी विसर्जन झालं. राज्यात कोकण, कोल्हापूर, सातारा-सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील  इतर जिल्हे, औरंगाबाद-नांदेड आणि संपूर्ण मराठवाडा, जळगाव-धुळे आणि संपूर्ण खान्देश, नागपूर-चंद्रपूर आणि संपूर्ण पूर्व विदर्भ तसेच अमरावती-अकोला आणि संपूर्ण पश्चिम विदर्भात शाततेने बाप्पाचे विसर्जन झाले. काही ठिकाणी विसर्जन मिरवणुका उशिरा रात्रीपर्यंत सुरू असल्याने सोमवारी पहाटेपर्यंत त्याठिकाणच्या बाप्पाचे विसर्जन होईल अशी माहिती आहे.   मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर उसळली गणेशभक्तांची अलोट गर्दी गणेश विसर्जनासाठी मुंबईतील सर्वात मोठं गणेश विसर्जन स्थळ अशी ओळख असलेल्या गिरगाव चौपाटीवर लोखो गणेश भक्तांनी पुढच्या वर्षी लवकर या... असे म्हणत लाडक्या बाप्पाला निरोप दिला. रविवारी सकाळपासूनच मुंबईकरांनी गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी गिरगांव चौपाटीवर गर्दी केली होती. पावसाची ऊसंत असल्यामुळे भाविकांनी भर उन्हात गणेशाचं विसर्जन केलं. 10 दिवसांच्या धामधुमीनंतर गणेश मंडळांनी बाप्पांच्या भव्य मुर्ती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर आणल्या होत्या. बाप्पाच्या मूर्ती खोल समुद्रात नेण्यासाठी याठिकाणी अनेक तराफे आणि बोटी तैनात होत्या. बाप्पाची मुर्ती तराफे किंवा बोटींवर ठेऊन त्या खोल समुद्रात शिरवण्यासाठी नेल्या जात होत्या. खेतवाडीतल्या ९ व्या गल्लीतील चिंतामणी गणपती गिरगाव चौपाटीवर दाखल त्यावेळी ड्रोनच्या सहाय्याने टिपलेले दृष्य. बाप्पाचे विसर्जन करणाऱ्या गणेश भक्तांच्या सुरक्षेसाठी गिरगाव चौपाटीवर कोस्ट गार्ड देखील तैनात होते. गिरगाव समुद्र किनाऱ्यावर आणि परिसरात मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्यावतीने चोख व्यवस्था उभारण्यात आली होती. विसर्जन मिरवणुकीदरम्यान समाजकंटकांकडून कोणताही गैरप्रकार होऊ नये याची विशेष दक्षता घेण्यात आली होती. लाल बागचा राजाचेही गिरगाव चौपाटीवरच विसर्जन होणार आहे.  
corona virus btn
corona virus btn
Loading