मराठी बातम्या /बातम्या /देश /कुरुंदवाडच्या पाच मशिदीत गणरायाची स्थापना, 'पूजा' आणि 'इबादत' एकाच ठिकाणी!

कुरुंदवाडच्या पाच मशिदीत गणरायाची स्थापना, 'पूजा' आणि 'इबादत' एकाच ठिकाणी!

कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुरुंदवाडमध्ये चक्क पाच मशिदींमध्ये गणराया विराजमान होतात. सामाजिक सलोखा जपणाऱ्या या कुरुंदवाडने सर्वधर्मसमभावाचा नवा आदर्श घालून दिलाय.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुरुंदवाडमध्ये चक्क पाच मशिदींमध्ये गणराया विराजमान होतात. सामाजिक सलोखा जपणाऱ्या या कुरुंदवाडने सर्वधर्मसमभावाचा नवा आदर्श घालून दिलाय.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुरुंदवाडमध्ये चक्क पाच मशिदींमध्ये गणराया विराजमान होतात. सामाजिक सलोखा जपणाऱ्या या कुरुंदवाडने सर्वधर्मसमभावाचा नवा आदर्श घालून दिलाय.

  संदीप राजगोळकर, कोल्हापूर,ता.15 सप्टेंबर : महाराष्ट्राला पुरोगामी विचारांचा वारसा लाभला आहे आणि दरवर्षी गणेशोत्सवामध्येही हेच पुरोगामित्व आजही पाहायला मिळत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुरुंदवाडमध्ये चक्क पाच मशिदींमध्ये गणराया विराजमान होतात. सामाजिक सलोखा जपणाऱ्या या कुरुंदवाडने सर्वधर्मसमभावाचा नवा आदर्श घालून दिलाय. कुरुंदवाड हे कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेलं एक छोटेखानी शहर आहे. संस्थानकालीन शहर अशीही कुरुंदवाडची ओळख आहे.

  सामाजिक समरसता कमी होत असताना कुरुंदवाडमध्ये आजही धार्मिक सलोखा जपला जातोय. यंदा गणेशोत्सव आणि मोहरम हे दोन्ही सण तब्बल 35 वर्षांनंतर म्हणजेच 1982 सालानंतर एकत्र आले आहेत आणि अनेक दशकांपासून कुरुंदवाडमधल्या मशिदीमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे यंदा सगळ्या मशिदींमध्ये लंबोदर आणि पंजे एकत्रित विराजमान झालेत..म्हणूनच इथल्या हिंदू-मुस्लीम भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

  कुरुंदवाडमधल्या बैरागदार मशीद, कारखाना पीर मशीद, शेळके मशीद, ढेपनपूर मशीद, आणि कुडेखान पीर मशीद या 5 मशिदींमध्ये यंदा एकाच वेळी गणराया आणि पंजे एकत्र नांदत आहेत. या दोन्हींची पूजा एकत्रित मनोभावे केली जाते आणि यामध्ये आजची तरुण पिढीही मागे नाही. ही परंपरा त्यांनीही जोमानं सुरू ठेवली आहे.

  हिंदू आणि मुस्लिम धर्मियांचे सण एकत्र आले की पोलीस प्रशासनावर बंदोबस्ताचा ताण असतो मात्र कुरुंदवाडमधल्या या सामाजिक सलोख्यामुळे इथल्या पोलीस प्रशासनावरचा बंदोबस्ताचा ताण एकदम कमी झालाय.

  यंदा दोन्ही सण एकत्र आले आहेत आणि या पुढची तीन वर्षे अशाच पद्धतीने मोहरम आणि गणेशोत्सव एकत्र साजरे केले जाणार आहेत. त्यामुळे कुरुंदवाडमधला गणेशोत्सव आणि मोहरम दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे यात शंका नाही.

  बाॅलिवूड स्टार्सनी बाप्पाचं स्वागत केलं जल्लोषात

  First published:

  Tags: Kolhapur