Home /News /national /

8 पोलिसांची हत्या करणारा फरार गँगस्टर विकास दुबे मीडियासमोर करणार सरेंडर, शहरात अलर्ट

8 पोलिसांची हत्या करणारा फरार गँगस्टर विकास दुबे मीडियासमोर करणार सरेंडर, शहरात अलर्ट

दिल्ली एनसीआर क्षेत्रात पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. नोएडा फिल्मसिटीमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात केल्याचं सांगण्यात येत आहे.

    नवी दिल्ली, 08 जुलै : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूरमध्ये झालेल्या गोळीबारात 8 पोलिसांची हत्या करणारा आरोपी फरार गँगस्टर विकास दुबे (Vikas Dubey) मीडियाच्या समोर सरेंडर करण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून हाती आलेल्या माहितीनुसार, विकास दुबे आता मीडियासमोर स्वत:ला आणून आत्मसमर्पण करू शकतो. यासंबंधी माहिती मिळताच पोलिसही अलर्ट मोडवर आले आहेत. दिल्ली एनसीआर क्षेत्रात पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. नोएडा फिल्मसिटीमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात केल्याचं सांगण्यात येत आहे. कानपूरच्या बिकरू गावात गँगस्टर विकास दुबेला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर झालेल्या गोळीबारात एका अधिकाऱ्यासह 8 पोलीस ठार झाले. या घटनेपासून यूपी पोलीस आणि एसटीएफची टीम विकास दुबेचा शोध घेत आहे. यासंदर्भात पोलिसांनी बुधवारी सकाळी दिल्लीजवळील फरीदाबादमध्ये छापा टाकला. विकास दुबे इथं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, पोलीस येण्यापूर्वीच तो तिथून पळून गेला. या छाप्यात फरीदाबाद पोलिसांनी विकास दुबेच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. गँगस्टर विकास दुबे एन्काउंटरच्या भीतीनं फरार झाला आहे. उत्तर प्रदेशातील न्यायालयात अथवा पोलीस ठाण्यास सरेंडर केल्यानंतर खटला चालणार नाही एन्काउंटरमध्ये मारले जाऊ ही भीती विकास दुबेला असल्यानं तो फरार झाला आहे. विकास दुबे दिल्ली पोलिसांकडे स्वत:ला सरेंडर करू शकतो असाही कयास लावला जात आहे. दुसऱ्या राज्यात विकास दुबेनं सरेंडर केल्यानंतर तिथे कोर्टाची प्रक्रिया सुरू होईल. थेट एन्काउंटरचा निर्णय होणार नाही याची माहिती विकास दुबेला असल्यानं त्यानं पोलिसांना चकवा देऊन फरार झाला आहे. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक नेमलं आहे. दिल्ली पोलिसांनाही या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. अमर दुबे चकमकीत विकास दुबेचा खास गुंड ठार झाला. स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) च्या पथकाने हमीरपूर येथे चकमकीत अमरला ठार केले. कानपूर गोळीबारानंतर तो फरार होता. कोण आहे विकास दुबे? लहानपणापासून तो गुन्हेगारी विश्वास मोठा होत आला. त्याला यामध्ये त्याचं नाव मोठं करायचं आहे. त्यामुळे विश्वास दुबेने सगळ्यात आधी त्याची गँग बनवली. त्यांच्याकडून तो चोरी, दरोडे, खून असे प्रकार करू लागला. 19 वर्षांपूर्वी त्याने पोलीस ठाण्यात प्रवेश करून एका राज्यमंत्र्यांची हत्या केली होती आणि त्यानंतर त्याने राजकारणात येण्याचाही प्रयत्न केला. पण ते त्याला शक्य झालं नाही. विकासला अनेक वेळा अटक करण्यात आली. एकदा लखनऊमध्ये एसटीएफनंही त्याला ताब्यात घेतलं होतं. कानपूरमधल्या एका रहिवाशाने सांगितलं की, विकासने अनेक तरुणांची मोठी गँग तयार केली आहे. त्यांच्याकडून तो कानपूर ग्रामीण भागात दरोडे, चोऱ्यामाऱ्या, खून यासारखे भयंकर गुन्हे करतो. मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरमध्ये सेवानिवृत्त प्राचार्य सिद्धेश्वर पांडे यांच्या हत्येप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्याला म्हणायचे 'शिवलीचा डॉन' खरंतर, अनेक निवडणुका आणि राज्यातील सर्व प्रमुख पक्षांशी संबंधातील अनेक नेत्यांसाठी काम त्याने मोठी कामं केली आहेत. 2001 मध्ये विकास दुबे याने भाजप सरकारमधील राज्यमंत्री संतोष शुक्ला यांना पोलीस स्टेशनमध्ये घेरलं आणि गोळ्या घालून ठार केलं. या हायप्रोफाईल हत्येनंतर तो शिवलीच्या डॉन नावाने प्रसिद्ध झाला. त्याने कोर्टात आत्मसमर्पण केलं आणि काही महिन्यांनंतर जामिनावर बाहेर आला. संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Delhi latest news

    पुढील बातम्या