गेल्या काही दिवसांपासून विकास दुबे पोलिसांना चकवा देत होता. पोलिसांच्या नाकावर टिचून त्यानं रिक्षातून पळ काढल्याची माहिती मिळाली होती. एन्काउंटरच्या भीतीनं दिल्ली पोलीस किंवा मीडियासमोर सरेंडर करेल अशी माहिती मिळत होती. उज्जैनी इथल्या महाकाली मंदिरात विकास दुबेला पकडण्यात आलं आहे. कानपूरच्या बिकरू गावात गँगस्टर विकास दुबेला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर झालेल्या गोळीबारात एका अधिकाऱ्यासह 8 पोलीस ठार झाले. या घटनेपासून यूपी पोलीस आणि एसटीएफची टीम विकास दुबेचा शोध घेत होते. यासंदर्भात पोलिसांनी बुधवारी सकाळी दिल्लीजवळील फरीदाबादमध्ये छापा टाकला. विकास दुबे इथं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, पोलीस येण्यापूर्वीच तो तिथून पळून गेला. या छाप्यात फरीदाबाद पोलिसांनी विकास दुबेच्या तीन साथीदारांना अटक केली होती. उज्जैनी इथे गुरुवारी सकाळी विकास दुबेच्या मुस्क्या आवळण्यात अखेर यश आलं.Vikas Dubey, the main accused in #KanpurEncounter case, has been arrested at a police station in Ujjain (Madhya Pradesh), say UP Govt Sources pic.twitter.com/txjmhzJhmW
— ANI (@ANI) July 9, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uttar pradesh, Uttar pradesh news