• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • कुख्यात गँगस्टर काला जठेडीच्या मुसक्या आवळल्यानंतर लेडी डॉन गर्लफ्रेंडही पोलिसांच्या जाळ्यात

कुख्यात गँगस्टर काला जठेडीच्या मुसक्या आवळल्यानंतर लेडी डॉन गर्लफ्रेंडही पोलिसांच्या जाळ्यात

अनुराधा ऊर्फ मॅडम मिंज सुमारे 6 वर्षं राजस्थानमधला कुख्यात गॅंगस्टर आनंद पाल (Gangster Anand Pal) याच्या संपर्कात होती.

 • Share this:
  नवी दिल्ली, 31 जुलै : कुख्यात गॅंगस्टर (Gangster) काला जठेडी (Kala Jathedi) याला अटक (Arrest) केल्यानंतर अल्पावधीतच दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) स्पेशल सेलने काला जठेडी याची गर्लफ्रेंड आणि लेडी डॉन (Lady Don) अनुराग उर्फ अनुराधा चौधरीला अटक केली आहे. काला जठेडीला पकडण्यासाठी 7 लाख रुपये बक्षीस घोषित करण्यात आलं होतं. राजस्थानची ही लेडी डॉन अनुराग ऊर्फ अनुराधा चौधरी उर्फ मॅडम मिंज या नावाने ओळखली जात असे. यापूर्वी अनुराधाने डॉन आनंद पाल याची सहायक म्हणूनही काम केलं आहे. राजस्थान पोलिसांनी (Rajasthan Police) अनुराधाच्या अटकेसाठी 10 हजार रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं. तिच्यावर खंडणी, अपहरण आणि हत्येच्या प्रयत्नासह अन्य गंभीर गुन्हे दाखल आहेत. या दोघांनाही उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे अटक करण्यात आल्याचं 'दैनिक जागरण'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. काला जठेडी बॅंकॉकमध्ये लपला असल्याची चर्चा होती; मात्र तो भारतात राहून गुन्हे करीत होता. शुक्रवारी (30 जुलै) रात्री उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे त्याला अटक करण्यात आली. यापूर्वी 2020मध्ये काला जठेडी फरीदाबाद पोलिसांच्या तावडीतून निसटून फरार झाला आणि त्यानंतर तो एकदा नेपाळला गेला होता. काला जठेडी अनुराधासह उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) लपून बसला होता. तेथून ते सहारनपूर येथे येताच पोलिसांच्या तावडीत सापडले. काला जठेडीकडून एक पिस्तुल जप्त करण्यात आलं आहे. काला जठेडी परदेशातून नव्हे तर हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रातील मुंबई, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये लपून गुन्हे करत होता. पोलिसांच्या स्पेशल सेलने काला जठेडीला शनिवारी न्यायालयात हजर करून चौकशीसाठी रिमांडमध्ये घेण्याकरिता तयारी सुरू केली होती. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सोशल मीडियात पोस्ट करणं पडलं महागात, बीडच्या तरुणाला बेड्या अनुराधा ऊर्फ मॅडम मिंज सुमारे 6 वर्षं राजस्थानमधला कुख्यात गॅंगस्टर आनंद पाल (Gangster Anand Pal) याच्या संपर्कात होती. तसंच ती आनंद पालची गॅंगदेखील चालवत असे. त्या दरम्यान आनंद पाल हा राजस्थानमधला गॅंगस्टर राजू बसोदीच्या टार्गेटवर होता. आनंद पाल एनकाउंटरमध्ये मारला गेल्यानंतर अनुराधा राजू बसोदीच्या टार्गेटवर आली. त्यानंतर ती बलवीर बानूडासोबत काम करू लागली; मात्र बलवीर बानूडाला पोलिसांनी अटक केल्यानंतर ती लॉरेन्स बिश्नोईला साथ देऊ लागली. तिथेच तिची ओळख काला जठेडीशी झाली. आनंद पालच्या संपर्कात आल्यानंतर अनुराधाच्या साथीने आनंद पालने मोठ्या प्रमाणात पैसा कमवला. आनंद पालच्या एनकाउंटरदरम्यान (Encounter) अनुराधा राजस्थान पोलिसांच्या तावडीतून सुटून फरार झाली होती. यादरम्यान लॉरेन्स बिश्नोईच्या माध्यमातून तिची ओळख काला जठेडीशी झाली आणि त्यानंतर मागील 9 महिन्यांपासून काला आणि अनुराधा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in Relationship) राहत होते.
  First published: