Home /News /national /

Gangrape Case: चुलत भावानीच अल्पवयीन बहिणीला दिल्या नरकयातना, प्रसूतीवेळी पीडितेचा मृत्यू

Gangrape Case: चुलत भावानीच अल्पवयीन बहिणीला दिल्या नरकयातना, प्रसूतीवेळी पीडितेचा मृत्यू

अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी (Gang Rape) नवा खुलासा झाला आहे.

    उत्तर प्रदेश, 16 डिसेंबर: कानपूरमध्ये (Kanpur) अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी (Gang Rape) नवा खुलासा झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या चुलत भावाचाही या बलात्कारात सहभाग होता. आता पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी अल्पवयीन (accused are minors) आहेत. त्याच वेळी अटक केलेल्या लेखपालला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.सध्या या आधी मुख्य आरोपी करणला 6 डिसेंबरला अटक करण्यात आली होती. 11 ऑक्टोबर रोजी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी करण, लेखपाल रणजीत बरवार आणि दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल केली होती. हेही वाचा- दारुची बाटली हातात घेऊन डॉक्टरांचा धांगडधिंगा, डान्सचा Live Video या प्रकरणातील अल्पवयीन पीडितेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला आहे. त्याचवेळी आरोपीनं आपल्या मुलीला आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवलं आणि ती गरोदर असताना तिच्यावर बाळाचा गर्भपात करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप वडिलांनी केला होता. अल्पवयीन मुलीनं आपल्या काकीला सांगितलं होतं की, आरोपी दारूच्या नशेत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा. एफआयआर नोंदवल्यानंतर काकवानचे इन्स्पेक्टर कृष्ण कुमार कश्यप यांनी कारवाई केली नाही आणि एसपी आऊटर अजित सिन्हा यांनी या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर आरोपी करणला पोलिसांनी तुरुंगात पाठवण्यात आलं. बुधवारी अल्पवयीन मुलीने मृत बाळाला जन्म दिला आणि प्रसूतीदरम्यान तिचाही मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी लेखपाल रणजीत बारवार याला रात्री उशिरा अटक केली आणि चौकशीनंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. लेखपालने स्वत:ला निर्दोष असल्याचं सांगितलं बुधवारी गँगरेप प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपी लेखपाल रणजीतला न्यायालयात हजर करून तुरुंगात पाठवण्यात आलं आणि त्यानं म्हटलं की, आपण निर्दोष असून फसवण्यात येत आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर मी कधीच गावात गेलो नसल्याचं तो सांगतो. DNA नमुने हैदराबादला पाठवणार सध्या अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी एसपी आऊटर अजित सिन्हा यांनी सांगितले की, डीएनए चाचणीचे नमुने हैदराबादमधील डीएनए फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले जातील. यामध्ये मृत आणि नवजात अर्भकाच्या रक्ताचे नमुने याशिवाय अटक आरोपी, संशयितांच्या रक्ताचे नमुने तपासले जाणार आहेत. नमुन्याचा अहवाल लवकरात लवकर मिळविण्यासाठी पोलीस प्रयत्न करतील. 10 ऑक्टोबर रोजी मुलगी गरोदर असल्याचं आलं समोर याप्रकरणी वडिलांचं म्हणणं आहे की, मुलगी गरोदर असल्याचं त्यांना 10 ऑक्टोबर रोजी समजलं. त्याचवेळी पीडितेच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तिच्या वडिलांचीही चौकशी केली असता त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती नसल्याचे सांगितलं. त्यानंतर 10 ऑक्टोबर रोजी पहिल्यांदाच याची माहिती मिळाली. अल्पवयीन लेखपालच्या संपर्कात कशी आली हे माहीत नाही. हेही वाचा- Mumbai: हॉटेलात डांबून शरीराचे रोज व्हायचे सौदे, 20 वर्षीय तरुणीची व्यथा ऐकून पोलीसही सुन्न  वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, करण आणि इतर दोन आरोपी नातेवाईक आहेत आणि त्यांचं घरी येणं-जाणं असायचं. नातेसंबंधात असल्यामुळे तो असं काही करू शकेल असं कधीच वाटलं नव्हतं. खूप वर्षांपूर्वी आईचा मृत्यू मृत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, आपण मजुरीचे काम करतो आणि पीडितेच्या आईचा मृत्यू झाला आहे. तसंच अल्पवयीन मुलीला एक भाऊ देखील आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Gang Rape, Uttar pradesh

    पुढील बातम्या