या मंदिरातील सुवर्ण कलशाच्या सुरक्षेसाठी 11 वर्षात केला 5.73 कोटी रुपये खर्च, दीड किलोचा कलश

कलशाच्या सुरक्षा आणि देखभालीसाठी मंदिर समितीला मोठा खर्च करावा लागत आहे. गेल्या 11 वर्षांपासून या सुवर्ण कलशाच्या सुरक्षेसाठी तब्बल 5.73 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

कलशाच्या सुरक्षा आणि देखभालीसाठी मंदिर समितीला मोठा खर्च करावा लागत आहे. गेल्या 11 वर्षांपासून या सुवर्ण कलशाच्या सुरक्षेसाठी तब्बल 5.73 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:
    जयपूर, 19 जून : भारतात अनेक प्राचीन मंदिर (Ancient temple) आहेत. या मंदिरांची सुरक्षा देखभाल करण्यासाठी मंदिर समित्या कार्यरत आहेत. मंदिरांच्या सुरक्षेसह इतर कामांसाठी मोठा खर्च केला जातो. अशाच एका मंदिरात 107 वर्षांपासून गंगेचे पवित्र (Ganagjal) पाणी एका दीड किलोच्या सुवर्ण कलशामध्ये साठवूण ठेवले आहे. या कलशाच्या सुरक्षा आणि देखभालीसाठी मंदिर समितीला मोठा खर्च करावा लागत आहे. गेल्या 11 वर्षांपासून या सुवर्ण कलशाच्या सुरक्षेसाठी तब्बल 5.73 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गोविंद देवजी मंदिराच्या पाठिमागे देवस्थान विभागाच्या राजकीय प्रत्यक्ष प्रभार श्रेणी मंदिर श्री गंगाजीमध्ये 107 वर्षांपासून 1.50 किलो वजनाच्या सुवर्ण कलशामध्ये पवित्र गंगेचे पाणी ठेवले आहे. या सुवर्ण कलशाच्या सुरक्षेसाठी 1 इन्स्फेक्टर आणि 3 शिपाई 24 तास तैनात असतात. या कलशाच्या सुरक्षेसाठी दरवर्षी 90 लाख खर्च करावे लागत आहेत. हे मंदिर राजस्थानच्या जयपूर येथील आहे देवस्थान विभागाने जुलै 2010 ते 31 मार्च 2021 पर्यंत 5.73 कोटी रुपये खर्च केले आहेत. 10 जुलै, 2009 रोजी, सरकारी सहसचिवांच्या आदेशानुसार, देवस्थान विभागाच्या सहायक आयुक्तांनी मंदिरांचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू ट्रेजरीमध्ये ठेवल्या होत्या. परंतु, भाविकांच्या भावनेचा विचार करता हा सोन्याचा कलश मंदिरातच ठेवला आहे. त्याच्या सुरक्षेसाठी मोठा खर्च होत आहे. मात्र, हा कलश स्ट्रॉंग रूममध्ये का ठेवला नाही, असे प्रश्न ऑडिटमधून उपस्थित केले गेले. देयकाच्या बिलांबरोबरच गार्डचे हजेरी प्रमाणपत्रही दिले गेले नाही, असे त्यांनी म्हटले. ऑगस्ट 2020 मध्ये आयुक्त देवस्थान विभागाने प्रशासकीय मान्यतेसाठी परवानगी मागितली तेव्हा तत्कालीन सहसचिव अजयसिंह राठोड यांनी 19 नोव्हेंबर 2020 रोजी पोलीस सुरक्षेची मागील विधेयकं मंजूर करताना 31 मार्च 2021 पर्यंत पोलीस रक्षकांची सुरक्षा कायम ठेवण्यास परवानगी दिली. 1915 मध्ये मंदिर बांधण्यासाठी 35000 रुपये खर्च करण्यात आले 1915  सालामध्ये महाराजा सवाई माधवसिंग द्वितीय यांनी श्री गंगा जी मंदिर बांधले. गंगा दशमीला मंदिराचा पाटोत्सव झाला. मंदिर बांधणीवर 35000 खर्च केले होते. इतिहासकार डॉ. आनंद शर्मा म्हणतात की, महाराजा माधव सिंग यांना मुले नव्हती, त्यानंतर पासवानातून गंगा सिंग आणि गोपाळ सिंग मुले झाली. महाराजांचे हे दोन्ही पुत्र चेचकमुळे मरण पावले. या दोन मुलांच्या आठवणीत त्यांनी श्री गंगा जी आणि श्री गोपाळ जी या नावानं मंदिर बांधले. मंदिर बांधण्यासाठी गंगोत्री येथून पाणी आणले गेले गंगोत्रीमध्ये जेव्हा महाराजा माधव सिंग यांनी गंगा माता मंदिर बांधले तेव्हा तिथून आणलेले पाणीच या सोनेरी कलशात सुरक्षित आहे. सुवर्ण कलश 1100 तुकडे वितळवून बनविला गेला आहे. देवस्थान विभागाने पुढील भागावर शिक्का लावून गंगेचे पाणी सुरक्षित ठेवले आहे. त्याच वेळी गंगाजल कलशच्या तळाशी ठेवलेल्या चांदी-सोन्याच्या छोट्या कलात्मक कुंड्यांमध्येही साठवले गेले आहे.
    Published by:News18 Desk
    First published: