मराठी बातम्या /बातम्या /देश /

Ganeshostav 2022 : लोकमान्य टिळकांनी वाराणसीमध्ये सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे 125 वे वर्ष, पाहा VIDEO

Ganeshostav 2022 : लोकमान्य टिळकांनी वाराणसीमध्ये सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे 125 वे वर्ष, पाहा VIDEO

लोकमान्य टिळकांनी वाराणसीमध्ये गणेशोत्सवाला सुरूवात केली होती.

लोकमान्य टिळकांनी वाराणसीमध्ये गणेशोत्सवाला सुरूवात केली होती.

लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्राप्रमाणेच उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्येही गणेशोत्सवाला (Varanasi Ganeshostav) सुरूवात केली होती. यंदा या गणेशोत्सवाचं 125 वं वर्ष आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Varanasi, India
  • Published by:  Onkar Danke

अभिषेक जायसवाल, वारणासी, 31 ऑगस्ट : गणेशोत्सवाला आज (बुधवार)  सुरूवात होत आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधुम सर्वात जास्त असली तरी देशभरात अन्य ठिकाणी देखील गणेशोत्सव साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांनी (Lokmanya Tilak) इंग्रजांच्या विरूद्ध लढण्यासाठी भारतीयांना एकत्र करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरूवात केली. या उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करण्याचा त्यांचा उद्देश होता. त्यामुळे साहजिकच संपूर्ण देशात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होईल, असा टिळकांचा प्रयत्न होता. महाराष्ट्राप्रमाणेच उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्येही टिळकांनी गणेशोत्सवाला (Varanasi Ganeshostav) सुरूवात केली होती. यंदा या गणेशोत्सवाचं 125 वं वर्ष आहे.

वारणासीमध्ये अनेक मराठी कुटुंब असून त्यांनी अनेक वर्ष उत्तर प्रदेशात राहून देखील मराठी संस्कृती जपली आहे. येथील गणेश मंडळाला 125 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्य टिळकांनी याची स्थापना केला होती. गणेश उत्सव समितीच्या वेद प्रकाश रामचंद्र वेदांती यांनी दिलेल्या माहितीनुसार 1898 साली टिळकांनी येथील उत्सवाला सुरूवात केली. या उत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्य सैनिकांना एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

सात दिवसांचा उत्सव

वाराणसीमध्ये ब्रह्मा घाट परिसरातील मंगल भवनमध्ये महाराष्ट्रीयन कुटुंब मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करतात. इथं दरवर्षी प्रमाणे आजही बाप्पाच्या मूर्तीचं वाजत-गाजत आगमन होते. त्यानंतर पुढील सात दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. बाप्पासमोर सादर होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमातून वारणासीमधील नागरिकांना महाराष्ट्रीयन संस्कृतीचं दर्शन होते.

'येथे 7 दिवस गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली जाते. त्याचबरोबर यज्ञ आणि गणेश वंदना करण्यात येते. संपूर्ण आठवडाभर वेगवेगळे कार्यक्रम होतात. या कार्यक्रमाची तयारी नागपंचमीपासूनच सुरू होते. संगीत, नृत्यू, गणपती बाप्पावर आधारित चित्रकला अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं यावेळी आयोजन यावेळी करण्यात येते,' अशी माहिती या मंडळाचे सदस्य वत्सल जनार्दन शास्त्री यांनी दिली.

First published:

Tags: Culture and tradition, Ganesh chaturthi, Varanasi