धक्कादायक! महात्मा गांधींच्या अस्थींची चोरी, पोस्टरवर लिहलं राष्ट्रद्रोही

धक्कादायक! महात्मा गांधींच्या अस्थींची चोरी, पोस्टरवर लिहलं राष्ट्रद्रोही

2 ऑक्टोंबरला गांधी जयंतीदिनीच हा प्रकार घडल्यानं संताप व्यक्त केला जात आहे.

  • Share this:

रीवा, 04 ऑक्टोबर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबर रोजी 150 वी जयंती देशभर साजरी केली. दरम्यान, याच दिवशी मध्य प्रदेशात रीवा येथे असलेल्या त्यांच्या अस्थींची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञातांनी त्यांच्या फोटोवर राष्ट्रद्रोही असंही लिहलं. रीवा शहरातील बापू भवन इथं हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

गांधीजींच्या अस्थींची चोरी झाल्याचा प्रकार समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अज्ञातांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. रीवा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष गुरमीत सिंग यांनी याबाबतची तक्रार पोलिसांत दाखल केली. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

1948 साली मध्य प्रदेशमधील रीवा शहरातील भारत भवनमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या अस्थी ठेवण्यात आल्या होत्या. त्यांच्या जयंतीदिनीच अस्थींची चोरी झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यात राजकीय पक्षांचा हात असल्याचा आरोपही केला जात आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट भाजपनेच हे कृत्य केलं असल्याचं म्हटलं आहे. महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचं समर्थन करणाऱ्यांकडूनच हा प्रकार झाला असला पाहिजे असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

महात्मा गांधींच्या सर्व अस्थी नदीमध्ये विसर्जित करण्यात आल्या नव्हत्या. त्याचे भाग करून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये मध्य प्रदेशातील रीवा शहराचाही समावेश होता.

VIDEO: ठाण्यात गॅस पाईपलाईन फुटल्यानं उंच फवारे, परिसरातील गॅस पुरवठा बंद

First published: October 4, 2019, 3:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading