IPS ऑफिसरचा 'गांधीवाद', स्वत:चं घर ना गाडी...

IPS ऑफिसरचा 'गांधीवाद', स्वत:चं घर ना गाडी...

आतापर्यंत असा कोणता IPS अधिकारी असेल ज्याच्याकडे स्वत:चे घर आणि गाडी नाही?

  • Share this:

नवी दिल्ली, 30 जानेवारी :  30 जानेवारी...तिच तारीख...ज्या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची पुण्यतिथी असते. सध्याच्या परिस्थितीत स्वत:ला गांधीवादी म्हणणं आणि खरंच गांधीच्या विचारांचा आचरणात अवलंब करणं या दोन्ही वेगळ्या बाबी आहेत. मात्र हा फरक लक्षात येईल जेव्हा तुम्ही दिल्ली पोलिसांचे स्पेशल सीपी रॉबिन हिबु यांना पाहाल. तसं पाहता रॉबिन हे मोठ्या हुद्द्यावर काम करतात. देशात त्यांची ओळख आहे पहिले आदिवासी IPS. ते बरीच वर्ष यूएनमध्ये राहत होते. त्यांच्या नावावर दोन राष्ट्रपती मेडल, अनेक अवॉर्ड, प्रशस्ती पत्रक आणि अनेक पुरस्कार आहेत. त्यांना आपल्या करिअरदरम्यान भेदभावालादेखील सामोरं जावं लागलं होतं.

स्वत:चं घर ना गाडी..

रॉबिन गांधीवाद आपल्या आचरणात आणतात. आतापर्यंत असा कोणता IPS अधिकारी असेल ज्याच्याकडे स्वत:चे घर आणि गाडी नाही? रॉबिन यांच्याकडे घर नाही. तर साधी दुचाकीही नाहीये त्यांच्याकडे. जे लाकडाचे घर होते ते बापूंच्या प्रेमाखातर गरजुला देऊन टाकलं. अरुणाचल प्रदेशातील चीन सीमारेषेजवळील घनदाट जंगल आणि डोंगररांगानी पसरलेल्या होंग हे त्यांचं गाव. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनतरही मूलभूत गोष्टीही या गावात मिळणं अवघड. अशा परिस्थिती राहणारे रॉबिन 1993 साली स्पर्धा परीक्षेतून निवडून आले. त्यांचे वडिल लाकूडतोडण्याचं काम करीत असे. लहानपण गरीबीत गेलं.

जून 1893 मध्ये महात्मा गांधींना केवळ वर्णभेदामूळे आफ्रिकेतून चालत्या गाडीतून बाहेर करण्यात आलं होतं. तशीच घटना रॉबिनसोबतदेखील झाली. जेएनयूमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर एकेदिवशी ब्रम्हपूत्र मेलने प्रवास करीत असताना तिकीट असतानाही त्यांना जागेवरुन हटवण्यात आलं. त्यावेळी दिल्लीपर्य़ंतचा प्रवास त्यांनी शौचालयाजवळ बसून पार केला. अनेकदा चेहरेपट्टी पाहून चीनी समजले जाई. त्यावरुन त्यांच्यावर टीका केली जाई.

त्यांनी आपल्या गावातील ८ खोल्यांचे दोन मजली घर गांधी म्युजियमसाठी दिलं आहे. या नव्या म्युजियमसाठी  राजघाट येथील म्युजियमने बापूंची चप्पल आणि चश्मा देण्याचं आश्वासन दिलं आहे. येथे हजारो पुस्तकांची लायब्ररी तयार करण्यात आली आहे. जेथे विद्यार्थी येऊन वाचन करू शकतात. एका खोलीत आई मोफत डिस्पेंसरी चालवते व गावातील लोकांची सेवा करते. याशिवाय गावातील लोकांसाठी हेल्पिंग इंडिया नावाची संघटनाही रॉबिन यांनी तयार केली आहे.

First published: January 30, 2020, 9:05 AM IST
Tags:

ताज्या बातम्या