आधी भेट, आता कौतुक; राहुल गांधींची गडकरींकडून फक्त 'ही' अपेक्षा

आधी भेट, आता कौतुक; राहुल गांधींची गडकरींकडून फक्त 'ही' अपेक्षा

'नितीन गडकरींचं कौतुक आहे. कारण भाजपमध्ये बोलण्याची हिंमत असलेले ते एकमेव नेते आहेत'

  • Share this:

नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी हे त्यांच्या काही विधानांमुळे सध्या देशभरात चर्चेत आहेत. अशातच आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही गडकरींच्या विधानाचा दाखला देत एक ट्वीट करत गडकरी यांचं कौतुक केलं आहे.

'नितीन गडकरींचं कौतुक आहे. कारण भाजपमध्ये बोलण्याची हिंमत असलेले ते एकमेव नेते आहेत,' असं ट्वीट राहुल गांधींनी केलं आहे. राहुल यांनी गडकरी यांचं अभिनंदन करताना त्यांच्याकडून एक अपेक्षाही केली आहे.

'गडकरीजी, तुम्ही हिंमत दाखवतच आहात तर आता राफेल, शेतकरी प्रश्न आणि विविध संस्था नष्ट करण्याचा चाललेला प्रयत्न या तीन मुद्द्यांवरही बोला,' असं राहुल गांधी यांनी गडकरींना म्हटलं आहे.

गडकरींची विधानं आणि चर्चा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची गेल्या काही दिवसांतील विधानं देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहेत. नितीन गडकरी हे अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आहेत, असंही बोललं जात आहे.

'जो आपलं घर सांभाळू शकत नाही, तो देश काय सांभाळणार'

"भारतीय जनता पक्षासाठी, देशासाठी आपलं आयुष्य देण्यास तयार असणारे खूप लोक मला भेटतात. त्यांनी आधी आपलं घर सांभाळावं. जो आपलं घर सांभाळू शकत नाही तो देश सांभाळू शकत नाही," असं नितीन गडकरी नुकतंच अभाविपच्या एका कार्यक्रमात म्हणाले. 'आधी आपलं घर व्यवस्थित चालवा, मुलंबाळं सांभाळा आणि मग भाजपचं किंवा देशाचं काम करा', असा सल्ला गडकरींनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

'...तर लोक ठोकून काढतात'

'स्वप्नं दाखवणारे नेते लोकांना आवडतात, पण स्वप्न पूर्ण न करणाऱ्या नेत्यांना जनताच ठोकून काढते', असं वक्तव्य भाजपचे नेते आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केलं होतं. मुंबई भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या कार्यक्रमात अभिनेत्री ईशा कोप्पीकर हीने भाजपात प्रवेश केला. यावेळी बोलताना नितीन गडकरींनी पुन्हा एकदा एक सूचक विधान केलं होतं.

"कोणतेही स्वप्न असतं, ते ह्रदयात असतं. कोणतीही सत्ता डोळे वटारू शकते. पण कुणांच्या स्वप्नांना संपवू शकत नाही. स्वप्नांचं आणखी एक विशिष्ट असतं, जी लोकं स्वप्न दाखवत असता, पण ती पूर्ण करत नाही. अशा नेत्यांची जनता धुलाई करते. त्यामुळे स्वप्न असे दाखवा जे पूर्ण करता येऊ शकतात.", असं गडकरी म्हणाले होते. तसंच 'मी स्वप्नं दाखवणारा मंत्री नाही तर मी काम करुन दाखवणारा मंत्री आहे,' असंही ते म्हणाले.

गडकरींकडून इंदिरा गांधींचं कौतुक

गडकरींनी याआधीही अशी विधानं केली होती. नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये, 'इंदिरा गांधी यांनी अनेक ताकदवान नेत्यांना झुकवलं आणि आपलं कर्तृत्व सिद्ध केलं,' असं म्हणत गडकरी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं कौतुक केलं होतं. तसंच याआधी गडकरींनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचंही कौतुक केलं होतं.

'विजयाचे बाप अनेक असतात, पराभव अनाथ असतो'

पुण्यात 22 डिसेंबर रोजी झालेल्या एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले होते की, 'अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्त्वानं शिकलं पाहिजे. यशाचे बाप अनेक असतात पण अपयश अनाथ असतो. अपयश आल्यावर कमिटी बसते तर विजयावर आनंद व्यक्त केला जातो. मात्र, अपयशाची जबाबदारी घ्यायला नेतृत्त्वानं शिकलं पाहिजे.'

VIDEO : मोदी हे तर खोटारडे; शेवटी गडावरचा गडकरी महत्त्वाचा - राज ठाकरे

First published: February 4, 2019, 4:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading