माओवाद्यांच्या गडात पोहोचली 20 हजार जिवंत काडतूसं,दिल्लीत दुसरी रसद पकडली

News18 Lokmat | Updated On: Jul 24, 2018 06:42 PM IST

माओवाद्यांच्या गडात पोहोचली 20 हजार जिवंत काडतूसं,दिल्लीत दुसरी रसद पकडली

आनंद तिवारी, नवी दिल्ली 24 जुलै :  15 आॅगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनाच्या आधी नवी दिल्लीत मोठ्या प्रमाणात जिवंत काडतूस जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय. माओवाद्यांना ही काडतूसं पुरवली जाणार होती. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने जवळपास 407 जिवंत काडतूस जप्त केले असून एका जणाला ताब्यात घेतलंय. स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोद कुशवाहा आणि एसीपी गोविंद शर्मा यांच्या टीमला दिल्लीतून महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणावर काडतूस पोहोचवले जाणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे शांती वन भागात जाळं लावून बिहार इथं राहणाऱ्या राम किशन सिंहला 407 काडतुसासह अटक केली.

स्पेशल सेलने दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेले काडतूस हे इंसास रायफल आणि एसएलआर सारख्या शस्त्रासाठी वापरले जातात. जप्त करण्यात आलेले काडतूस हे गडचिरोली येथील माओवाद्यांना पुरवले जाणार होते.  आरोपी रामकृष्णची चौकशी केली असता त्याने 20 हजार काडतूस महाराष्ट्रातील माओवाद्यांकडे पोहोचले आहे. त्याबद्दल मोठी आर्थिक देवाणघेवाण झाली आहे. हा तोच भाग आहे जिथे माओवाद्यांनी जवानांवर हल्ला केला होता. म्हणजे माओवाद्यांच्या किल्ल्यात हे काडतूस पोहचणार होते. काडतूस पुरवठा करणारा राम किशन सिंह हा बिहार येथील भोजपूर जिल्ह्यात राहणार आहे. आधी तो एका खासगी शाळेत शिक्षक होता. नोकरी सुटल्यानंतर तो काडतूस पुरवठा करण्याच्या कामात जोडला गेला. याआधी 2015 मध्ये त्याला अटक झाली होती.

तुम्हाला वजन कमी करायचंय? मग आहारात हे हवंच!

असं सांगितलं जातंय की, आरोपी हा माओवाद्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्याने काडतूस आणि शस्त्र पुरवठा करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत बिहारमधील काही शस्त्र आणि काडतूस सप्लायर्सकडून रामकिशनने काडतूस मिळवले होते. धक्कादायक म्हणजे, रामकिशनकडून जप्त करण्यात आलेले काडतूस हे कुणालाही मिळत नाही. आता हेच जाणून घेण्यासाठी रामकिशनची स्पेशल सेलची टीम बिहारला रवाना झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2018 06:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...