मराठी बातम्या /बातम्या /देश /मोदींच्या प्रयत्नांना यश, 2022 च्या G20 परिषदेचा मान भारताला मिळणार!

मोदींच्या प्रयत्नांना यश, 2022 च्या G20 परिषदेचा मान भारताला मिळणार!

भारत हा जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारतात या, इथल्या आदरातिथ्याचा अनुभव घ्या असंही पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

भारत हा जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारतात या, इथल्या आदरातिथ्याचा अनुभव घ्या असंही पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

भारत हा जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारतात या, इथल्या आदरातिथ्याचा अनुभव घ्या असंही पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

    ब्यूनस आयर्स, 2 डिसेंबर : अर्जेटिनाची राजधानी ब्यूनस आयर्स इथं सुरू असलेल्या G20 देशांच्या शिखर परिषदेत भारताच्या मुत्सद्देगिरील यश आलंय. 2022 मध्ये होणाऱ्या शिखर परिषदेचं यजमानपद भारताला देण्याच्या निर्णयाला सर्व देशांनी मान्यता दिली आहे. आधी ही परिषद इटलीला होणार होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत इटलीनं भारताची विनंती मान्य केली. 2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूण होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर भारताला या परिषदेचं यजमानपद हवं होतं.

    भारताच्या स्वातंत्र्याला 2022 मध्ये 75 वर्ष पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवानिमित्त G20 परिषद घेण्याचा मान भारताला मिळावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. रोटेशननुसार ही परिषद इटलीला होणार होती. मात्र भारताच्या विनंतीला मान देत इटलीने यासाठी तयारी दाखवली आणि इतर सदस्य देशांनीही त्याला मान्यता दिली.

    आधीच्या योजनेनुसार 2021 मध्ये भारतात ही परिषद होणार होती. ही मान्यता मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आम्ही जगभरातल्या नेत्यांचं स्वागत करण्यास उत्सुक आहोत. सर्वांना मी भारतात येण्याचं निमंत्रण देतो.

    भारत हा जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारतात या, इथल्या आदरातिथ्याचा अनुभव घ्या असंही पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. भारताच्या मुत्सद्देगिरीचं हे मोठं यश समजलं जातं. जगातली सर्व विकसनशील देश या परिषदेचे सदस्य असून जगभरातले सर्व मोठे नेते या परिषदेला हजेरी लावत असतात.

    संगीताच्या कार्यक्रमात पैशांचा तुफान पाऊस, VIDEO पाहून तुम्ही अचंबित व्हाल

    First published:

    Tags: G20, G20 summit, India, Narendra modi, जी20, नरेंद्र मोदी, भारत