‘माणुसकी’सगळ्यात पहिले, कोरोना ‘G 20’ परिषदेत मोदींचा सल्ला, अर्थव्यवस्थेत ओतणार 5 लाख कोटी डॉलर्स

‘माणुसकी’सगळ्यात पहिले, कोरोना ‘G 20’ परिषदेत मोदींचा सल्ला, अर्थव्यवस्थेत ओतणार 5 लाख कोटी डॉलर्स

अर्थव्यवस्थेला जी मरगळ आली आहे आहे ती दूर करण्यासाठी जी 20 या संघटनेचे सर्व देश 5 लाख कोटी डॉलर्सचा निधी उभा करणार.

  • Share this:

नवी दिल्ली 26 मार्च : कोरोना हा जागतिक साथीचा रोग ठरल्याने सर्व जगच हादरून गेलं आहे. सर्व जगासमोर संकट निर्माण करणाऱ्या कोरोनावर चर्चा करण्यासाठी ‘G 20’ या प्रगत देशांच्या प्रमुखांची परिषद झाली. सर्व नेते व्हिडीओ कॉन्फरन्सने जोडले गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, क्षी जिनपिंग, यांच्यासह सदस्य देशांचे अनेक नेते यात सहभागी झाले होते. हा व्हायरस म्हणजे मानवतेसमोरचं आव्हान असून सगळ्यांनी मिळून याचा मुकाबला केला पाहिजे असं मत नरेंद्र मोदींनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. माणुसकी सगळ्यात पाहिले असली पाहिजे असंही ते म्हणाले.

सर्व जगात यावर जे संशोधन सुरू आहे त्याचं आदानप्रदान झालं पाहिजे असा सल्लाही त्यांनी सर्व नेत्यांना दिला. जागतिक अर्थव्यवस्थेला जी मरगळ आली आहे आहे ती दूर करण्यासाठी जी 20 या संघटनेचे सर्व देश 5 लाख कोटी डॉलर्सचा निधी उभा करतील असा निर्णयही या परिषदेत घेण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानेच ही परिषद घेण्यात आली होती. सोदीअरेबिया हा सध्या या संघटनेचा अध्यक्ष आहे. त्यामुळे मंगळवारी पंतप्रधनांनी सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर सलमान यांनी अध्यक्ष या नात्याने ही बैठक बोलावली होती.

कोरोनामुळे मृत्यूची किती टक्के आहे शक्यता? काय आहे जगातल्या तज्ज्ञांचं मत?

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. त्यानंतर सर्व देश एक प्रकारे घरातच बदिस्त झाला आहे. कोरोनाचा प्रसार रोखायला असेल तर लॉकडाउन हा सर्वात मोठा उपाय आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं होतं. सध्यातरी त्याच्याशिवाय मार्ग नाही असंही त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. कोरोना हा एका माणसातून दुसऱ्यामध्ये संक्रमीत होते. त्यामुळे त्याची साखळी तोडणं आवश्यक असते.

त्यामुळे तज्ज्ञांच्या सूचनेनुसार तीन आठवड्यांचा लॉकडाउन करण्यात आला आहे. आजचा लॉकडाउनचा दुसरा दिवस आहे. पण कोरोनाचा प्रसार थांबला नाही तर लॉकडाउन वाढवला जावू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दिवसभरात 15, एकूण 77 : वुहानसारखं मुंबई होणार देशातलं कोरोनाव्हायरसचं केंद्र?

लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारने हातावर पोट असणाऱ्या गरीबांसाठी मोठी घोषणा केली. धान्य आणि थेट त्यांच्या बँक खात्यात पैसेही जमा होणार आहेत. हे पुढचे तीन महिने राहणार असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. त्यामुळे लॉकडाउन वाढणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

First published: March 26, 2020, 9:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading