G-20 Summit : नरेंद्र मोदी – डोनाल्ड ट्रम्प भेटीत या मुद्यांवर झाली चर्चा

G-20 Summit : Donald trump आणि Narendra modi यांची ओसाका येथे भेट झाली.

News18 Lokmat | Updated On: Jun 28, 2019 10:50 AM IST

G-20 Summit : नरेंद्र मोदी – डोनाल्ड ट्रम्प भेटीत या मुद्यांवर झाली चर्चा

ओसाका, 28 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी ओसाका इथं G-20 Summitमध्ये सहभागी झाले. यावेळी नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये इराण, द्विपक्षीय संबंध आणि सुरक्षेवर चर्चा झाली. तसंच डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांनी मिळवलेल्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन देखील केलं. नरेंद्र मोदी यांनी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प – मोदी भेट पहिल्यांदाच झाली. आम्ही चांगले मित्र झालो आहोत. शिवाय, दोन्ही देशांमधील संबंध देखील दिवसेंदिवस सुधारत असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदीं यांच्यावर ‘तुम्ही चांगलं काम करत आहात. तुम्ही पहिल्यांदा सत्तेत आलात तेव्हा तुमच्याविरोधात असणारे तुमच्यासोबत आहेत. ही तुमच्या क्षमतांचा विजय’ असल्याचं म्हणत कौतुकांचा वर्षाव केला.

Loading...

स्विस बँकेत भारतीयांचे 99 लाख कोटी रूपये; SNB Reportमधून खुलासा

रोजागारावर बोलले नरेंद्र मोदी

कुशल कारागिरांना जगाच्या पाठीवर काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे त्या देशाचा देखील फायदा आहे. अमेरिकेच्या HB-1 व्हिसा धोरणाला उद्देशून नरेंद्र मोदी यांनी हा उल्लेख केल्याचं बोललं जात आहे.

PNB Scam : नीरव मोदीनं जेलमध्ये मागितला लॅपटॉप

दहशतवाद मानवतेसाठी धोका

यावेळी नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाचा देखील मुद्दा उपस्थित केला. दहशतवाद हा मानवतेसाठी धोका असल्याचं नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटलं. दहशतवादामुळे केवळ निष्पापांचे जीव नाही जात तर, त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक प्रगतीला खिळ बसते असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. शिवाय, दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलण्याची गरज देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवली.

VIDEO: अखेर पावसाची प्रतीक्षा संपली! मुंबईसह राज्यात दमदार पावसाची हजेरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 10:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...