G-20 SUMMIT: 'मोदी...तुम्ही किती चांगले आहात', ऑस्ट्रेलियन PMने सेल्फी घेत केलं कौतुक

G-20 SUMMIT: 'मोदी...तुम्ही किती चांगले आहात', ऑस्ट्रेलियन PMने सेल्फी घेत केलं कौतुक

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान मॉरिसन यांनी नरेंद्र मोदींसोबत एक सेल्फी काढला आहे.

  • Share this:

ओसाका (जपान), 29 जून : जपानच्या ओसाका शहरात जी-20 समिटसाठी जगभरातील नेत्यांनी हजेरी लावली आहे. या नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील या जी-20 समिटसाठी गेले आहेत. यावेळी त्यांनी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची भेट घेतली. या भेटीनंतर मॉरिसन यांनी नरेंद्र मोदींचं खास शब्दांत कौतुक केलं आहे.

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान मॉरिसन यांनी नरेंद्र मोदींसोबत एक सेल्फी काढला. तसंच या सेल्फीला 'कितना अच्छा हैं मोदी' असं कॅप्शन दिलं आहे. ऑस्ट्रेलियन पंतप्रधानाने मोदींची हिंदी भाषेत स्तुती केल्याने हे ट्वीट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे.

मोदी-ट्रम्प भेट

नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये इराण, द्विपक्षीय संबंध आणि सुरक्षेवर चर्चा झाली. तसंच डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांनी मिळवलेल्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदनदेखील केलं. नरेंद्र मोदी यांनी पुन्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प – मोदी भेट पहिल्यांदाच झाली. आम्ही चांगले मित्र झालो आहोत. शिवाय, दोन्ही देशांमधील संबंध देखील दिवसेंदिवस सुधारत असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं.

ट्रम्प यांनी असा कोणता विनोद केला, ज्यावर खळखळून हसले मोदी?

जी-20 समिटमध्ये भारत आणि अमेरिकेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या समिटमध्ये मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान काही हलके-फुलके क्षणही आले. यातीलच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ट्रम्प यांचं बोलणं पूर्ण होताच नरेंद्र मोदी खळखळून हसताना दिसत आहेत. त्यामुळे ट्रम्प यांनी मोदींना नेमका कोणता विनोद सांगितला? असा मजेशीर प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे.

एका हातात जनतेचे प्रश्न दुसऱ्या हातात सिगरेट, पाहा काँग्रेस मंत्र्याचा प्रताप

First published: June 29, 2019, 12:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading