आजपासून 11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेला सुरूवात

या वेबसाईटवरून भरा ऑनलाईन फॉर्म

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Jun 13, 2018 08:45 AM IST

आजपासून 11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेला सुरूवात

मुंबई, 13 जून : दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचे लक्ष अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेकडे लागले आहे. ही प्रक्रिया आजपासून सुरू होणार असून ४ ऑगस्टला संपणार आहे. त्यामुळे कोणतीही हलगर्जी न करता दिलेल्या तारखांच्या आता विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरावे असं आव्हान करण्यात आलं आहे.

त्यात, यंदा प्रथमच बायफोकलचे प्रवेश ऑनलाइन होणार असल्यामुळे या प्रवेशप्रक्रियेचा कालावधी वाढला आहे. यामुळे ज्या कॉलेजांचे ७० टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत, त्यांनी कॉलेज सुरू करण्यास हरकत नाही, असंही सांगण्यात आलं आहे.

10वीची परिक्षा उत्तीर्ण होऊन महाविद्यालयीन शिक्षणाला सुरूवात म्हणजे आयुष्यातला एक मोठा टप्पा आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या क्षेत्रात पुढचं शिक्षण घ्यायचं आहे, त्याचा योग्य विचार करून मगच अॅडमिशनसाठी अर्ज करा. आता तुम्ही ज्या क्षेत्राची निवड करणार आहात त्यात तुमचे भविष्य असणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या आणि आपल्या पालकांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्या.

या वेबसाईटवरून भरा ऑनलाईन फॉर्म

https://mumbai.11thadmission.net/

Loading...

 

============================================================

 

हेही वाचा...

625 पैकी 624 गुण मिळाले म्हणून टॉपरने उत्तरपत्रिका पुन्हा तपासणीसाठी दिली आणि...!

VIDEO : मास्तर म्हणाले होशील नापास पण झाला पास, पठ्याची मिरवणूक सरांच्या दारात

दहावीत टॉप केलं म्हणून योगी आदित्यनाथ यांनी दिलेला चेक झाला बाऊंस आणि...!

अंधत्वावर मात करून डोंबिवलीकर विद्यार्थ्यांने मिळवले दहावीत 95 टक्के गूण

राज्यातील दहावीचा निकाल 89.41 टक्के, मुलींची बाजी, कोकण विभाग अग्रेसर

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2018 08:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...