नवी दिल्ली, 06 डिसेंबर : लग्न म्हटलं की त्यातील प्रत्येक विधी महत्त्वपूर्ण समजला जातो. लग्नातील प्रत्येक विधी हा व्यवस्थित व्हावा, यासाठी वधू-वरांकडील मंडळी प्रयत्न करीत असतात. तर, लग्नातील काही विधींना धार्मिक महत्त्व नसलं तरी रितीरिवाज, परंपरा म्हणून ते आजही पाळले जातात. त्यातीलच एक रीत म्हणजे लग्नसोहळ्यात नवरदेवाचे बूट लपवणं. पण एका लग्नात नवरदेवाचा बूट चोरून लपवण्याचा प्रकार खूपच मजेशीर ठरला असून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लग्नात नवरदेवाचा बूट चोरला खरा, पण त्यानंतर नवरदेवानं जे काही केलं, ते पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.
नवरदेवाचा बूट चोरून तो लपवण्याच्या परंपरेला हिंदू विवाहांमध्ये महत्त्व आहे. नवरदेवाचे बूट चोरण्याचं मुख्य काम त्याच्या मेव्हण्यांचं अर्थात नवरी मुलीच्या बहिणीचं असतं. बूट चोरून त्या नवरदेवाकडे पैसे मागतात. लग्नातील या प्रकाराचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. अनेकदा असा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या लग्नामध्ये बूट चोरण्याचा घडलेला प्रकारही आठवला असेल. पण बूट चोरीला गेल्यावर नवरदेवाचं लहान मुलासारखं रडणं तुम्ही क्वचितच पाहिलं किंवा ऐकलं असेल. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून जो पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.
व्हिडिओमध्ये नेमकं काय?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुणी नवरदेवाचे बूट चोरते, पण त्यानंतर नवरदेवाने केलेला गोंधळ पाहून लग्नाला आलेली वऱ्हाडी मंडळींही आश्चर्यचकित होतात. या व्हिडिओमध्ये नवरदेव वधूसोबत एका खोलीत बसलेला दिसत आहे. तेवढ्यात एक मुलगी खोलीमध्ये हळूच येते, आणि नवरदेवाच्या शेजारी असणारे बूट घेऊन पळून जाते.
हे वाचा - इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक; नदीप्रमाणे वाहतोय लाव्हा, पुलही वितळले, VIDEO
त्यानंतर मात्र नवरदेव जोरजोरात रडायला लागतो. एवढचं नाही, तर नवरदेव लहान मुलासारखा जमिनीवर लोळायलादेखील लागतो. नवरदेवाची ही अवस्था पाहून त्याचे चोरलेले बूट परत केले जातात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.
View this post on Instagram
बटरफ्लाय माही नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून तो पूर्णपणे स्क्रिप्टेड आहे, असं वाटेल. पण तो पाहिल्यानंतर तुम्हाला स्वतःचं हसू मात्र आवरता येणार नाही. या व्हिडिओला अनेकांनी लाईक केलं असून कमेंटही केल्या आहेत.
हे वाचा - तुम्हाला किती वाटलं तरी तुम्ही हे बिस्किट खाऊच शकणार नाही, कारण...
दरम्यान, आजकाल लग्नसोहळ्यातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील बहुतांश व्हिडिओ मजेशीर असल्याने लोकांना ते पाहण्यास सुद्धा आवडतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.