आर्थिक घोटाळेबाजांची देशातली संपत्ती जप्त होणार, विशेष कायद्याला मंजुरी

आर्थिक घोटाळेबाजांची देशातली संपत्ती जप्त होणार, विशेष कायद्याला मंजुरी

घोटाळेबाजांची देशातली सर्व संपत्ती जप्त करण्यासाठी केंद्र सरकारनं विशेष कायद्याला मंजुरी दिलीय.

  • Share this:

01 मार्च : आधी विजय मल्ल्या आणि आता नीरव मोदी मोठे आर्थिक घोटाळे करून देशातून फरार झालेल्यांची यादी मोठी आहे. मात्र अशा घोटाळेबाजांची देशातली सर्व संपत्ती जप्त करण्यासाठी केंद्र सरकारनं विशेष कायद्याला मंजुरी दिलीय.

'फ्युजेटिव्ह ऑफेंडर्स बिल'ला कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनी दिलीय. या कायद्यातल्या तरतुदीनुसार आर्थिक घोटाळा करणाऱ्यांची बेनामी मालमत्तेसह सर्व संपत्ती जप्त करण्यात येणार आहे.

तसंच गुन्हेगाराच्या परदेशातील संपत्तीवर टाच आणण्याची तरतूद देखील या कायद्यात करण्यात आलीये. मात्र त्यासाठी भारताला विविध देशांशी करार करावा लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 1, 2018 11:46 PM IST

ताज्या बातम्या