महिनाभरानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पहिल्यांदाच वाढ , 'हे' आहेत नवे दर

गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर कमी होताना पाहायला मिळत होते. त्यामुळे सर्वसामान्यांनी समाधान व्यक्त केलं होतं. पण आता पुन्हा एकदा दरवाढ झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 7, 2019 09:23 AM IST

महिनाभरानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पहिल्यांदाच वाढ , 'हे' आहेत नवे दर

मुंबई, 7 जानेवारी :  देशातील प्रमुख चार शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव पुन्हा एकदा वाढले आहेत. पेट्रोलच्या दरात 21 पैशांनी तर डिझेलमध्ये 8 पैशांची दरवाढ झाली आहे. 17 डिसेंबरनंतर ही पहिलीच इंधन दरवाढ आहे.

गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर कमी होताना पाहायला मिळत होते. त्यामुळे सर्वसामान्यांनी समाधान व्यक्त केलं होतं. पण आता पुन्हा एकदा दरवाढ झाली आहे. ही दरवाढ जर परत एकदा वेगाने होत राहिली, तर सरकारला पुन्हा लोकांच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो.

किती आहेत मुंबईतील दर?

पेट्रोल : 74.16

डिझेल : 65.12

Loading...पेट्रोल-डिझेलचे दर का झाले होते कमी?

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या कमी होणाऱ्या किमती हे पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याचं मुख्य कारण आहे. मागील एका महिन्यात कच्च्या तेलाचे दर 40 टक्क्यांनी दर कमी झाले आहेत. तसंच लिबियाकडून अलिकडच्या काळात कच्च्या तेलाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.

ऑक्टोबरमध्ये कच्च्या तेलाचे दर 84 डॉलर प्रतिबॅरल एवढे होते. आता हेच दर 55 डॉलर प्रतिबॅरल इतके घसरले आहेत.


VIDEO : सांगलीमधील प्रकाश आंबेडकर यांचं अनकट भाषण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 7, 2019 09:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...