पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल, जाणून घ्या काय आहेत आजचे दर

मागच्या 6 दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाल्यानंतर आजचे दर स्थिर आहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 9, 2019 10:30 AM IST

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल, जाणून घ्या काय आहेत आजचे दर

मुंबई, 09 ऑक्टोबर: सहा दिवसांपासून सलग पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण होत असताना मात्र आज (09 ऑक्टोबर)इंधनाचे दर स्थिर आहेत. मंगळवारी पेट्रोलचे 17 पैसे तर डिझेल लिटरमागे 10 पैसे कमी झालं होतं. मागच्या महिन्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलने रेकॉर्ड ब्रेक असा महागाईचा विक्रम केला होता. त्यानंतर पुन्हा गेल्या आठवड्यात दोन्हीचे दर कमी झाले असून बुधवारी स्थिरावले आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यानं पर्यायानं भाजी-फळ बाजारातही मोठी महागाई वाढत होती. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसला होता. मात्र आज दर स्थिरावल्यानं व्यापारी आणि लोकांमध्ये दिलासादायक वातावरण आहे.

इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार असे आहेत बुधवारचे पेट्रोल डिझेलचे दर

दिल्ली- पेट्रोल- 73. 59, डिझेल- 66. 81

मुंबई- पेट्रोल- 79. 20, डिझेल- 70. 03

कोलकाता- पेट्रोल- 76. 23, डिझेल- 69. 17

Loading...

चेन्नई- पेट्रोल- 76. 43, डिझेल- 70. 57

मुंबईमध्ये सर्वाधिक म्हणजेच आज 79.20 पेट्रोलचे तर चेन्नईमध्ये डिझेल 70.57 असे दर आहेत. तर सर्वात कमी पेट्रोल दिल्लीत आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेल मुंबई, कोलकाता आणि चैन्नईच्या तुलनेत दिल्लीमध्ये कमी आहे. दिल्लीक पेट्रोल 73.59 रुपये तर डिझेल 66 81 रुपये लिटर असा बुधावारचा दर आहे.

अशी बदलते पेट्रोलची किंमत जाणून घ्या.

पेट्रोल-डिझेलचे दर दर दिवशी बदलत असल्यानं रोजच्या दराबाबत नागरिकांना उत्सुकता असते. मात्र तुम्हाला माहीत आहे का? पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज सकाळी 6 वाजता बदलतात. म्हणजे बदललेला रेट काय आहे हे तुम्हाला सकाळी 6 वाजता समजतं. पेट्रोल आणि डिझेलमध्ये डीलर कमीशन, एक्साइज ड्युटी आणि इतर कर सामावून त्याची किंमत दुप्पट होत असते. त्यामुळे सर्व पेट्रोल पंपावर 6 वाजता हे दर बदलले जातात.

SMS वर तुम्ही पाहू शकता इंधनाचे दर

रोज बदलणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी प्रशासनाने एक सुविधा उपलब्ध केली आहे. यामध्ये तुमच्या शहरात इंधनाचे दर काय आहेत हे जाणून घेण्यासाठी डिलर किंवा व्यापाऱ्यांसाठी इंडियन ऑयल ग्राहक RSP<डीलर कोड> 92249 9 2249 या नंबरवर मेसेज करू शकतात. ग्राहकांसाठी एचपीसीएल ग्राहक कोड HPPRICE<डीलर कोड> 9222201122 या नंबरवर मेसेज केल्यानंतर तुमच्या शहरातील लेटेस्ट इंधनाचे दर समजण्यास मदत होऊ शकते.

आईच्या कुशीतून 8 महिन्यांच्या बाळाला पळवलं, धक्कादायक CCTV VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2019 09:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...