नवी दिल्ली, 30 मार्च: मागील काही दिवसांत पेट्रोल डिजेलच्या किमतींनी आकाशाला भिडल्या होत्या. त्यानंतर आता सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel) किंमतींत घट करून (Petrol Diesel prices reduced again) नागरिकांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. आज देशात पेट्रोल प्रतिलिटर 22 पैशांनी तर डिझेल 23 पैशांनी स्वस्त झालं आहे. इंधनाच्या दरात घट केल्यानंतर मंगळवारी राजधानीत पेट्रोलचा दर 90.56 रुपये आहे, तर डिझेल 80.87 रुपये प्रतिलिटर दराने विकलं जात आहे. दर मुंबईत पेट्रोलची किंमत 96.98 रुपये एवढी आहे, तर डिझेलची किंमत प्रतिलिटर 87.96 रुपये इतकी आहे.
यापूर्वी 24 आणि 25 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालं होतं. दोन सलग इंधन दरात कपात केल्यामुळे दिल्लीत पेट्रोल 39 पैशांनी आणि डिझेलमध्ये 37 पैशांनी स्वस्त झालं आहे.
(हे वाचा- आमदाराच्या ड्रायव्हरकडे 1 कोटी सापडल्याने खळबळ, Income Tax ची छापेमारी)
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल होत असतो. इंधनाचे नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते. त्याचबरोबर परदेशी चलनाच्या किंमतीसोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, यावरून देशातील इंधनाच्या किमती ठरवल्या जातात.
फेब्रुवारीत 5 रुपयांनी पेट्रोल महागलं
गेल्या महिन्यात 10 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान देशांतर्गत तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात प्रतिलिटर 4 ते 5 रुपयांची वाढ केली होती. परंतु 26 फेब्रुवारीनंतर कच्च्या तेलाच्या किमतीत 8 डॉलरपेक्षा अधिक वाढ झाली आहे. दरम्यान 27 फेब्रुवारीला पेट्रोलच्या दरात किरकोळ वाढ करण्यात आली आहे.
जाणून घ्या देशातील महत्त्वाच्या शहरांमधील इंधनाचे दर
>> दिल्लीत पेट्रोल 90.56 रुपये, तर डिझेल 80.87 रुपये प्रतिलिटर आहे
>> मुंबईत पेट्रोल 96.98 रुपये, तर डिझेल 87.96 रुपये प्रतिलिटर आहे
>> चेन्नईमध्ये पेट्रोल 92.58 रुपये, तर डिझेल 85.88 रुपये प्रतिलिटर आहे
>> कोलकातामध्ये पेट्रोल 90.77 रुपये, तर डिझेल प्रतिलिटर 83.75 रुपये आहे
(हे वाचा-कोरोना पॉझिटिव्ह पोलिसाला दिलं एक्सपायर इन्सुलिन, भोंगळ कारभारामुळे संताप)
>> नोएडामध्ये पेट्रोल 88.91 रुपये, तर डिझेल प्रतिलिटर 81.33 रुपये आहे
>> बंगळुरूमध्ये पेट्रोल 93.59 रुपये, तर डिझेल 85.75 रुपये प्रतिलिटर आहे
>> भोपाळमध्ये पेट्रोल 98.58 रुपये, तर डिझेल 89.13 रुपये प्रतिलिटर आहे
>> चंडीगडमध्ये पेट्रोल 87.14 रुपये, तर डिझेल 80.57 रुपये प्रतिलिटर आहे
>> पाटण्यात पेट्रोल 92.89 रुपये, तर डिझेल 86.12 रुपये प्रतिलिटर आहे
>> लखनऊमध्ये पेट्रोल 88.85 रुपये, तर डिझेल 81.27 रुपये प्रति लिटर आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India, Maharashtra, Petrol, Petrol and diesel price, Petrol Diesel hike