मतदान संपताच पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, मुंबईकरांना मोजावे लागतील इतके रुपये!

मतदान संपताच पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, मुंबईकरांना मोजावे लागतील इतके रुपये!

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होताच पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 मे: लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होताच पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत होती. मात्र लोकसभेसाठी सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात मतदान झाल्यानंतर इंधनाच्या दरात वाढ झाली.

पेट्रोलच्या दरात 5 पैशांनी तर डिझेलच्या दरात 9 पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे मुंबईकरांना एक लिटर पेट्रोलसाठी 76.78 रुपये तर डिझेलसाठी 69.35 मोजावे लागणार आहेत. मुंबई प्रमाणेच दिल्लीत देखील इंधनाचे दर वाढले आहेत. दिल्लीकरांना पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे 71.17 तर 66.2 रुपये मोजावे लागतील. इंधन दरवाढीसंदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारकडून निवडणुकीच्या काळात इंधन दर वाढ करु नये अशा सूचना दिल्या गेल्या होता. आज झालेली दरवाढ ही नियमित स्वरुपाची असल्याचा दावा इंधन कंपन्यांनी घेतला आहे.

निवडणुकीच्या काळात इंधन दरात फारशी वाढ झाली नव्हती. त्यामुळे गेल्या काही दिवसात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आता दरवाढ करण्यात आल्याची चर्चा आहे. याचा फटका आता सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.

VIDEO : शरद पवारांनी मागितली 'अल्लाह ताला से दुआ'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2019 09:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading