नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच पेट्रोल-डिझेलचे दर सतत वाढत आहेत. सततच्या वाढीने काही दिवसांतच पेट्रोल-डिझेल 4 रुपयांपर्यंत महागलं आहे. बुधवारी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एका एका लिखित प्रश्नांला उत्तर देताना, केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर लागणाऱ्या टॅक्समध्ये कोणतीही कपात करणार नसल्याचं सांगितलं.
पेट्रोलियम मंत्र्यांनी सरकारकडे पेट्रोल आणि डिझेलवर लागणारा टॅक्स कमी करण्याबाबत सध्या कोणताही प्रस्ताव नसल्याचं सांगितलं. पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स वाढवणं किंवा कमी करणं सरकारच्या गरजेच्या आणि मार्केट स्थितीसारख्या अनेक बाबींवर अवलंबून असल्याचंही ते म्हणाले.
तीन दिवसांत पेट्रोल-डिझेल जवळपास एक रुपयाने महागलं आहे. दिल्लीत मंगळवार आणि बुधवारी पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने 60 पैसे प्रति लीटरची वाढ झाली आहे. तर आज पुन्हा पेट्रोल-डिझेल 25 पैसे प्रति लीटर महागलं आहे. दिल्लीत एक लीटर पेट्रोल 87.85 रुपये आहे,तर डिझेल 73.03 रुपये इतकं आहे.
>> मुंबईमध्ये पेट्रोल 94.36 रुपये आणि डिझेल 84.94 रुपये प्रति लीटर आहे.
>> कोलकातामध्ये पेट्रोल 89.16 रुपये आणि डिझेल 81.61 रुपये प्रति लीटर आहे.
>> चेन्नईत पेट्रोल 90.81 रुपये आणि डिझेल 83.18 रुपये प्रति लीटर आहे.
>> बेंगळुरूत पेट्रोल 90.78 रुपये आणि डिझेल 82.72 रुपये प्रति लीटर आहे.
>> नोएडात पेट्रोल 86.83 रुपये आणि डिझेल 78.45 रुपये प्रति लीटर आहे.
>> चंडीगढमध्ये पेट्रोल 84.55 रुपये आणि डिझेल 77.74 रुपये प्रति लीटर आहे.
>> पटनात पेट्रोल 90.27 रुपये आणि डिझेल 83.22 रुपये प्रति लीटर आहे.
>> लखनऊमध्ये पेट्रोल 86.77 रुपये आणि डिझेल 78.39 रुपये प्रति लीटर आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीत सतत वाढ होत असल्याने त्याचा थेट परिणाम किरकोळ इंधन विक्रीवरही होतो आहे.