Fuel for India 2020: फेसबुक का करतोय भारतात आणि Jioमध्ये गुंतवणूक? मार्क झुकरबर्गने सांगितल्या 12 खास गोष्टी

Fuel for India 2020: फेसबुक का करतोय भारतात आणि Jioमध्ये गुंतवणूक? मार्क झुकरबर्गने सांगितल्या 12 खास गोष्टी

भारताच्या भविष्याबाबत पुरेसा विश्वास असल्याने आपण भारतात गुंतवणूक केली असल्याचे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग (Mark Zukerburg) यांनी स्पष्ट केले आहे

 • Share this:

नवी दिल्ली 15 डिसेंबर: सोशल मीडियातील प्रमुख आणि सर्वात मोठी कंपनी फेसबुक (Facebook)ने येत्या काळात भारतात आणखी मोठी गुंतवणूक करु इच्छित आहे. यासाठी फेसबुकने 15 आणि 16 डिसेंबरला फ्युल फॉर इंडीया 2020 (Fuel For India 2020) या नावाने एका इव्हेंटचे आयोजन केले आहे. फेसबुक प्लॅटफार्मवर या इव्हेंटचे प्रसारणही करण्यात येत आहे. यावेळी फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg)  आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीएमडी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्यात गुंतवणूक आणि विस्ताराच्या संधींबाबत सविस्तर चर्चाही झाली. या दरम्यान मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक भारत रिलायन्स जीओमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर का गुंतवणूक करीत आहे, हे स्पष्ट केले आहे.

फेसबुकचे मुख्य महसूल अधिकारी डेव्हिड फिशर याबाबत म्हणाले, की डिजीटल इनोव्हेशनला प्राधान्य देण्यासाठी  भारत असा एकमेव देश आहे की जिथे फेसबुकने मीशो आणि अनअकॅडमी सारख्या कंपन्यांमध्ये अल्पांश भागीदारी (Minority Shares) घेतली आहे. फेसबुक भारतमध्ये दिर्घकालीन गुंतवणूकीसाठी प्रयत्न करत आहे. आनलाईन व्यवहारांमध्ये वाढ होण्यासाठी सातत्याने ते व्यवसायात नाविन्यपूर्ण बाबी आणत आहेत असंही त्यांनी सांगितलं.

हे आहेत फेसबुक फ्युएल फार इंडीया 2020 मधील पहिल्या दिवसाचे 12 अपडेटस

 1. भारताच्या भविष्याबाबत पुरेसा विश्वास असल्याने आपण भारतात गुंतवणूक केली असल्याचे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग (Mark Zukerburg) यांनी स्पष्ट केले आहे. जिओ(Jio) आणि फेसबुक(Facebook) व्हॅल्यू एडेड क्रिएटर बनू शकतात, असे मुकेश अंबानी म्हटले आहे. WhatsApp आणि Facebookचे कोट्ययवधी ग्राहक आहेत.
 2. मुकेश अंबानी यांनी म्हटले की कोरोनाच्या संकटकाळात देशात वर्कफ्रॉम होम आणि लर्नफ्रॉम होम या दोन्ही संकल्पना यशस्वी झाल्या आहेत. देशाचा विकास यापुढेही सुरुच राहणार आहे. लवकरच देशातील प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न 1800 डॉलरवरुन 5000 डॉलर होणार आहे. भारतात मोठ्या संधी आहेत. येत्या 20 वर्षांत भारत जगातील 3 टॉप अर्थव्यवस्थांमध्ये सामिल होणार, असून त्याच दिशेने आमचा प्रवास सुरु आहे.
 3. मुकेश अंबानी पुढे म्हणाले, देशातील डिजीटल क्रांतीतील संधींबाबत व्यापक चर्चा सुरु आहे. संकटातही नव्या संधींमुळे मार्ग निघतो. देशात कोरोनामुंळे अनेक संधी दृष्टीक्षेपात आल्या आहेत. डिजीटल इंडियामुळे (Digital India) विकासाच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना जाते.
 4. मुकेश अंबानी यांनी सांगितले, की  पंतप्रधान मोदी यांनी संकटातही संधींचा शोध घेतला. कोरोनाकाळात देशातील 20 कोटी लोकांना थेट रक्कम दिली. गरीब कुटुंबांच्या मदतीसाठी पावले उचलली गेली. रिलायन्सकडूनही मोठ्या प्रमाणात गरजूंना मदत देण्यात आली.
 5.  जिओ मार्ट रिटेल (Jio Mart)च्या माध्यमातून संधींचा विस्तार करण्यात येईल. यामाध्यमातून छोटया शहरांतील लहान दुकानदारांना जोडले जाईल आणि याव्दारे लाखो नवे रोजगार तयार होतील. जिओ आता डिजीटल कनेक्टिव्हिटी घेऊन आला आहे. यात व्हॉटसअॅप पेसह चॅटचा देखील समावेश आहे, यामुळे कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होणार आहे, असे मुकेश अंबानी यांनी स्पष्ट केले,
 6.  कोरोनाकाळात भारतात सर्वाधिक प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक झाली आहे. फेसबुक(Facebook) जिओमध्ये करीत असलेली गुंतवणूक ही सर्वात मोठी परकीय गुंतवणूक आहे. फेसबुक आणि जिओ(Jio) मिळून छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देतील. छोट्या उद्योगांसाठी व्हॅल्यू क्रिएशन प्लॅटफार्म तयार करण्यात येत आहे, असे अंबानी यांनी सांगितले.
 7. देशातील सर्व शाळांना जोडण्याचे काम जिओच्या (Jio) माध्यमातून सुरु आहे. त्याचबरोबर आरोग्यक्षेत्रातील मान्यवरांना सहभागी करुन घेत त्यांना तंत्रज्ञान ओळख करुन देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, असे अंबानी म्हणाले.
 8. जिओने फ्री व्हॉईस(Free Voice) सर्व्हिस देण्याची घोषणा केली आहे. याचा आम्हाला अभिमान असल्याचे अंबानी म्हणाले.
 9. या कार्यक्रमात मार्क झुकेरबर्ग यांनी भारताच्या डिजीटल इंडिया (Digital India) अभियानाचे कौतुक केले. या अभियानामुळे विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होतील, असे ते म्हणाले. भारतात शानदार व्यावसायिक संस्कृती आहे. येथे व्हॉटसअॅपच्या व्यावसायिक यूझर्सची संख्या 1.5 कोटींवर गेली आहे. या देशात अर्थिक सर्वसमावेशकता (Financial Inclusive) वाढत असून हा चांगला ट्रेंड आहे.
 10. यंदा कोरोना (Corona) काळादरम्यान तांत्रिक बाबींचे महत्व अधोरेखित झाले आहे. लोकांशी जोडण्यासाठी तंत्रज्ञान हे एक महत्वाचे माध्यम ठरले आहे. लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्यात तंत्रज्ञान हा घटक महत्वाचा ठरला असल्याचे झुकरबर्ग म्हणाले.
 11. आम्ही गेल्या वर्षी भारतात व्हॉट्सअप पे(Whatsapp pay) लाँच केले. यूपीआय़ (UPI) तंत्र आणि 140 बॅंकांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले. यासाठी पुढाकार घेणारा भारत हा जगातील पहिला देश ठरल्याचे झुकरबर्ग यांनी सांगितले.
 12.  फेसबुकने (Facebook) मुकेश अंबानी यांच्या जिओ(Jio) प्लॅटफार्ममध्ये 9.99 टक्के इक्विटी खरेदी केली आहे. यासाठी त्यांनी 43,574 कोटी गुंतवणूक केली. या दोघांमधील गुंतवणूक विषयक घोषणा 22 एप्रिलला करण्यात आली होती. त्यावर 24 जूनला भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने शिक्कामोर्तब केले होते.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 15, 2020, 9:25 PM IST
Tags: Facebook

ताज्या बातम्या