सुखोई ते राफेल : वायुसेनेच्या विमानांबद्दल जाणून घ्या

सुखोई ते राफेल : वायुसेनेच्या विमानांबद्दल जाणून घ्या

भारतीय वायुसेनेला स्थापन होऊन 88 वर्ष पूर्ण झाली आहेत. 8 ऑक्टोबर 1932 ला भारतीय वायुसेने (Indian Airforce) ची स्थापना झाली होती. जगभरातील ताकदवान वायुसेनांच्या यादीत भारतीय वायुसेनेचा समावेश होतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : भारतीय वायुसेनेला स्थापन होऊन 88 वर्ष पूर्ण झाली आहेत. 8 ऑक्टोबर 1932 ला भारतीय वायुसेने (Indian Airforce) ची स्थापना झाली होती. जगभरातील ताकदवान वायुसेनांच्या यादीत भारतीय वायुसेनेचा समावेश होतो.  भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात विविध प्रकारच्या लढाऊ विमानांचा समावेश आहे. बॉर्डरवर अनेक विमाने भारतीय सीमांचं रक्षण करत असतात. आज आपण भारताच्या काही महत्त्वाच्या लढाऊ विमानांची माहिती जाणून घेणार आहोत.

1)SU-30 MKI

भारतीय वायुसेनेतील लढाऊ विमान असलेलं सुखोई दोन आसनी आणि दोन इंजिन असणारं रशियन बनावटीचं विमान आहे. हे विमान सर्व प्रकारच्या हवामानात काम करू शकतं. या विमानात हवेतून-हवेत आणि हवेतून-जमिनीवर मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. या विमानाला वन एक्स 30mm GSH गन बसवली असून, ते 8 हजार किलो दारुगोळा वाहून नेतं. त्याचबरोबर ताशी 2500 किलोमीटर इतका या विमानाचा वेग आहे.

2)Mirage-2000

मिराज-2000 हे फ्रान्सच्या Dassault Aviation कंपनीने बनवलेलं लढाऊ विमान आहे. यात केवळ एक जण बसू शकतो. ताशी कमाल 2495 किमीचा पल्ला हे विमान गाठू शकतं. एका मिनिटात हे विमान 56000 फूट उंची गाठू शकतं. या विमानात दोन 30mm इंटिग्रल कॅनन, 2 मात्रा सुपर 530D मीडियम रेंज आणि 2 R-550 मॅजिक II क्लोज कॉम्बॅट मिसाइल वाहून नेण्याची क्षमता आहे.

हे वाचा-साखर झोपेत असताना 33 मजली इमारतीत अग्नितांडव, आगीची भीषणता दाखवणारा LIVE VIDEO

3) Rafale

मिराज-2000 प्रमाणेच राफेलची निर्मिती देखील फ्रान्सच्या Dassault Aviation कंपनीने केली आहे. ताशी कमाल 2,222 किमीचा पल्ला हे विमान गाठू शकतं. या विमानामध्ये असलेल्या प्रगत तंत्रज्ञानामुळे या विमानाला ‘omnirole’ aircraft देखील म्हटलं जातं. सध्या भारताने 36 राफेल विमानांची ऑर्डर दिली असून भविष्यात आणखी विमाने खरेदी केली जाऊ शकतात.

4) Tejas

स्वदेशी बनावटीचे तेजस हे विमान भारतीय बनावटीचं पहिलं लढाऊ विमान असून, ते Hindustan Aeronautics Limited ने बनवलं आहे. 2016 मध्ये भारतीय वायुसेनेत या विमानाचा समावेश करण्यात आला होता. ताशी कमाल 2,205 किमीचा पल्ला हे विमान गाठू शकतं.

हे वाचा-जुगाऱ्याने दिलेल्या लॉटरीमुळे भिकाऱ्यांच नशीब फळफळलं; आलिशान घराचं स्वप्न पूर्ण

5)Jaguar

भारतीय हवाई दलात या विमानांचा समावेश 1979 मध्ये केला गेला. जग्वार हे भारतीय हवाई दलाचे दोन इंजिने असलेले छोटे लढाऊ विमान आहे. 'जग्वार' हे कमी उंचीवरून उडत शत्रूचा वेध घेणारे लढाऊ विमान आहे. भारतीय हवाई दलामध्ये या विमानाला फार महत्व असून कारगिल युद्धामध्ये या विमानांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. ताशी कमाल 1,350 किमीचा पल्ला हे विमान गाठू शकतं. भरपूर वजन वाहून नेणं आणि उच्च अल्टिट्युडला वेगाने उडणं ही याची खासियत आहे.

Published by: Shreyas
First published: October 10, 2020, 8:00 AM IST
Tags:

ताज्या बातम्या