S M L

'येडियुरप्पा' कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, असा होता राजकीय प्रवास

येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. भाजपकडे सध्या १०४ आमदार असून बहुमतासाठी त्यांना आणखी सात आमदारांची गरज आहे त्यामुळे ते ही मॅजिक फिगर नेमकी कशी जुळवतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Renuka Dhaybar | Updated On: May 17, 2018 11:16 AM IST

'येडियुरप्पा' कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, असा होता राजकीय प्रवास

17 मे : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचे बी. एस. येडियुरप्पा यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. बंगळुरूमधल्या राजभवानात हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान आणि प्रकाश जावडेकर उपस्थित होते.

येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. भाजपकडे सध्या १०४ आमदार असून बहुमतासाठी त्यांना आणखी सात आमदारांची गरज आहे त्यामुळे ते ही मॅजिक फिगर नेमकी कशी जुळवतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

पण दरम्यान, येडियुरप्पा हे असं मोठ नाव आहे की, भाजप पक्षाने विधान सभा निवडणुकांमध्ये पहिलेच त्यांच्या नावाची घोषणा केली. राईल मिलच्या क्लार्कपासून ते शेतकरी नेता आणि आता कर्नाटकचे मुख्यमंत्री असा खडतर प्रवास येडियुरप्पा यांनी केला आहे.

असा होता येडियुरप्पांचा 'राजकीय प्रवास'

- मूळचे मंड्या इथले

Loading...
Loading...

- 1983पासून शिमोगातल्या शिकारीपुरा मतदारसंघातून विजयी

- 1972मध्ये जनसंघाचे तालुका अध्यक्ष

- आणीबाणीत तुरुंगवसाही

- 1983 - पहिल्यांदा विधानसभेवर निवड

- 1994 - येडियुरप्पा पहिल्यांदा विरोधी पक्षनेते

- 1999 - विधानसभेतून पराभूत, विधानपरिषदेतून आमदार

- 2004 - विधानसभेचे विरोधी पक्षनेते

जेडीएसशी युती

- 20 महिन्यांसाठी मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा निर्णय

- कुमारस्वामींचा राजीनामा द्यायला नकार

- भाजपनं कुमारस्वामी सरकारचा पाठिंबा काढला

- 2007- दोन्ही पक्षांचा सत्ता स्थापनेचा निर्णय

येडियुरप्पा मुख्यमंत्री

- 2011- जेडीएसनं पाठिंबा काढला

- येडियुरप्पांना राजीनामा द्यावा लागला

- खाण घोटाळ्यात येडियुरप्पा लाचखोरीत दोषी

- खाण घोटाळा प्रकरणी तुरुंगवासही

- भ्रष्टाचार प्रकरणी तुरुंगात जाणारे पहिले मुख्यमंत्री

- 2012- आमदारकीचा राजीनामा, भाजपला सोडचिठ्ठी

- नोव्हें. 2013- भाजपत परतले

आणि आता ते कर्नाटकात भाजपचे मुख्यमंत्री आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 17, 2018 11:08 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close