विस्तारासाठी मुहूर्तच मिळेना? तेलंगणात फक्त दोन मंत्र्यांचे मंत्रिमंडळ!

जुन्या मंत्र्यांसह वरिष्ठ आमदाराना मंत्रीपदाचं स्वप्न पडत असल्याने आमदारांची घालमेलही वाढली आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 11, 2019 07:03 PM IST

विस्तारासाठी मुहूर्तच मिळेना? तेलंगणात फक्त दोन मंत्र्यांचे मंत्रिमंडळ!

महेश तिवारी, हैदराबाद, 11 फेब्रुवारी : तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा जोतिष्य, मुहूर्त यांच्यावर खूप विश्वास आहे. प्रत्येक गोष्ट ते मुहूर्त पाहूनच करतात. मग ते निवडणुकीसाठी फॉर्म भरणं असो की राजीनामा देणं प्रत्येक गोष्टीसाठी ते ज्योतिषाची मदत घेतता. तेलंगणात विधानसभेच्या निवडणुका होऊन दोन महिले झालेत. या निवडणुकीत केसीआर यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीला दणदणीत विजय मिळला. मात्र अजुनही राव यांनी मंत्री मंडळाचा विस्तारच केलेला नाही. कारण काय तर फक्त मुहूर्त सापडेना असं दिलं जात आहे.


एखाद्या राज्यात निवडणुकीनंतर लोकनियुक्त सरकार येतं किंवा काही कारणांमुळे राष्ट्रपती राजवट लागू होते मात्र निवडणुका होऊन दोन महीने लोटल्यानंतरही केवळ एक मुख्यमंत्री आणि एक मंत्री राज्य चालवताहेत ही वस्तुस्थिती आहे. तेलंगणात निवडणुकीच्या दोन महीन्यानंतरही केवळ मुख्यमंत्री केसीआर आणि एकच मंत्री संपुर्ण राज्य चालवत आहेत हे वास्तव आहे.


तेलंगणात डिसेंबरच्या पहील्या आठवडयात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाला जनतेने भरभरुन मतदान केल बहुमत मिळाल्याने या पक्षाचे सर्वेसर्वा के चंद्रशेखरराव यानी 15 डिसेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी मंत्री म्हणुन फक्त मोहम्मद अली या माजी उपमुख्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली त्यानंतर आजतागयत तेलंगणात मंञीमंडळाचा विस्तार झाला नाही.

Loading...


केसीआर मुहूर्ताला खुप मानतात त्यातुनच मंञीमंडळाच्या विस्तारासाठी मकरसंक्रांतीपर्यंत मंञीमंडळच अस्तित्वात आल नाही त्यानंतर विविध राजकीय कारणांमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला  त्यामुळे राज्याचा गाडा फक्त दोन मंत्र्यांच्या जीवावर सुरू आहे. तर अनेक जुन्या मंत्र्यांसह वरिष्ठ आमदाराना मंत्रीपदाचं स्वप्न पडत असल्याने आमदारांची घालमेलही वाढली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 11, 2019 05:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...