मराठी बातम्या /बातम्या /देश /फ्लॉप क्रिकेटरने केला मोठा 'गेम', राजकीय मैदानात काढली भाजपची विकेट!

फ्लॉप क्रिकेटरने केला मोठा 'गेम', राजकीय मैदानात काढली भाजपची विकेट!

बिहारमध्ये (Bihar) नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भाजपची (BJP) साथ सोडली आहे. नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

पटणा, 10 ऑगस्ट : बिहारमध्ये नितीश कुमार (Bihar Nitish Kumar) यांनी पुन्हा एकदा भाजपची साथ सोडली आहे. काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी आज आरजेडीच्या (RJD) मदतीने पुन्हा एकदा सत्तास्थापन करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांच्यासोबत लालू प्रसाद यादव यांचे पूत्र तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) उपमुख्यमंत्री झाले आहेत. क्रिकेटच्या मैदानात फ्लॉप ठरलेल्या तेजस्वी यादव यांनी राजकारणाच्या मैदानात मात्र मोठा खेळ करत भाजपची विकेट काढली आहे.

राजकारणामध्ये प्रवेश मिळवण्याआधी तेजस्वी यादव यांनी क्रिकेटमध्येही त्यांचं नशीब आजमावलं होतं. आयपीएल (IPL)मध्ये तेजस्वी यादव दिल्ली डेयरडेव्हिल्स (Delhi Daredevils) टीमसोबत होते. 2009 ते 2012 या कालावधीमध्ये दिल्लीच्या टीमसोबत असूनही त्यांना एकदाही खेळायची संधी मिळाली नाही.

राष्ट्रीय स्तरावर अंडर-19 क्रिकेट खेळल्यानंतर तेजस्वी यादव यांच्यासोबत दिल्लीच्या टीमने 2009 साली करार केला. त्यावेळी लालूप्रसाद यादव देशाचे रेल्वेमंत्री होते. 2009 ते 2012 या कालावधीमध्ये बेंचवर बसून राहिलेल्या तेजस्वी यादव यांना दिल्लीच्या टीमने 30-40 लाख रुपये दिल्याचं सांगितलं जातं.

2010 साली तेजस्वी यादव यांनी बिहारच्या निवडणुकीत वडील लालूप्रसाद यादव यांच्यासाठी प्रचाराला सुरुवात केली. दोन वर्षानंतर संसदेमध्ये बोलताना लालूप्रसाद यादव म्हणाले, 'माझा मुलगा दिल्लीच्या टीममध्ये आहे, पण त्याने आतापर्यंत फक्त मैदानात पाणी नेण्याचं काम केलं आहे. त्यांनी तेजस्वीला खेळण्याची संधी दिली नाही.'

स्थानिक क्रिकेटमध्ये तेजस्वी यादव यांनी 7 मॅचमध्ये 37 रन केल्या, तसंच त्यांना फक्त 1 विकेट घेण्यात यश आलं. 2009 साली झारखंडसाठी रणजी ट्रॉफी (प्रथम श्रेणी मॅच) खेळताना तेजस्वी सातव्या क्रमांकावर बटिंगला उतरले. पहिल्या इनिंगमध्ये त्यांना 1 रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 19 रन करता आले, त्यामुळे त्यांची सरासरी 10 एवढी राहिली. तर या मॅमध्ये त्यांनी 5 ओव्हर टाकल्या, पण त्यांना एकही विकेट मिळाली नाही.

First published:

Tags: Bihar, BJP, Nitish kumar