Home /News /national /

इंजीनिअरिंग ते Pulitzer पुरस्कार जिंकणारी फोटोजर्नलिस्ट! अनुश्री फडणवीसच्या 'त्या' फोटोमागील कहाणी

इंजीनिअरिंग ते Pulitzer पुरस्कार जिंकणारी फोटोजर्नलिस्ट! अनुश्री फडणवीसच्या 'त्या' फोटोमागील कहाणी

'अनुश्री फडणवीस' भारतातील Reuters या वृत्तसंस्थेच्या त्या तीन फोटोग्राफर्स पैकी एक आहे ज्यांना गेल्या आठवड्यात जगाला हादरवून सोडणाऱ्या घटनांच्या कव्हरेजसाठी प्रतिष्ठित Pulitzer पुरस्कार देण्यात आला.

  मुंबई, 11 मे : 'अनुश्री फडणवीस' भारतातील Reuters या वृत्तसंस्थेच्या त्या तीन फोटोग्राफर्स पैकी एक आहे ज्यांना गेल्या आठवड्यात जगाला हादरवून सोडणाऱ्या घटनांच्या कव्हरेजसाठी प्रतिष्ठित Pulitzer पुरस्कार देण्यात आला. अनुश्रीने हाँग काँगमधील आंदोलनाचं कव्हरेज केलं होतं. 'ते सर्व खरं होतं आणि आवाहन हे होतं की जेवढं शक्य तेवढ्या संवेदनशीलतेने लोकांना ही कहाणी सांगणं', अशी प्रतिक्रिया फोटोग्राफर अनुश्री फडणवीस हिने दिली. अनुश्रीबरोबर अदनान अबिदीदेखील Reuters च्या विजेत्या फोटोग्राफर्स पैकी एक! गेल्या वर्षी हाँगकाँगमध्ये लोकशाहीसाठी सरकारविरोधात झालेल्या आंदोलनाचे कव्हरेज करणाऱ्या टीममध्ये हे दोन भारतीय फोटोग्राफर्स होते. ब्रेकिंग न्यूज कॅटेगरीमधील त्यांच्या फोटोंचे जागतिक स्तरावर विशेष कौतुक झाले. दरम्यान फीचर फोटोग्राफी (Feature Photography) या कॅटेगरीमध्ये यासीन दार, मुख्तार खान आणि चन्नी आनंद या भारतीय फोटोग्राफर्सना देखील प्रतिष्ठित Pulitzer पुरस्काराने गौरवण्यात आले. (हे वाचा-VIDEO: कोरोनाविरोधात 9 देशातील 17 कलाकार एकत्र, भारतीय संगीतातून शांतीचा संदेश) जेव्हा हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ सरकारविरोधातील आंदोलकांनी पोलिसांपासून पळण्यास सुरुवात केली, त्यावेळी अनुश्री आणि तिच्या टीमने काढलेला फोटो तिला एवढा मोठा सन्मान मिळवून देणारा ठरला. 'आंदोलक विमानातळावर व्यत्यय आणण्याच्या प्रयत्नात होते. पोलिसांनी त्याना तिथे गाठवल्यावर त्यांनी त्यांचा मोर्चा मेट्रो स्टेशनकडे वळवला. जेणेकरून सबवे ट्रेन्सच्या वाहतुकीमध्ये व्यत्यय आणता येईल. तुंग चुंग मेट्रो स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर आंदोलनकांनी बॅरिकेट्स आणि विटा टाकून त्यांनी रस्ता अडवण्यास सुरूवात केली,' त्या फोटोग्राफबद्दल सांगताना अनुश्रीच्या या आठवणी जाग्या झाल्या.  ढगाळलेल्या वातावरणात त्याठिकाणी सामान्य नागरिक आपापले सामान घेऊन त्या पडलेल्या विटांमधून विमातळाकडे जाताना अनुश्रीने पाहिले. 'मी लोकांना त्यांच्या गाडीतून उतरून चालत जाताना पाहिले. त्यातील काहींनी निदर्शकांना पाठिंबा दर्शवला आणि काही इतरांनी निदर्शकांबरोबर विमातळाकडे जाण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनावेळी लोकांना किती त्रास झाला हे मी काढलेल्या फोटोतून दिसते,' असंही अनुश्री म्हणाली. हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारा रस्ता सरकारविरोधी आंदोलकांनी विटा आणि बॅरिकेट्सच्या मदतीने बंद करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी अनेक नागरिकांनी त्यामधूनच वाट काढण्याचा प्रयत्न केला. (फोटो सौजन्य-अनुश्री फडणवीस/Reuters)
  हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारा रस्ता सरकारविरोधी आंदोलकांनी विटा आणि बॅरिकेट्सच्या मदतीने बंद करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी अनेक नागरिकांनी त्यामधूनच वाट काढण्याचा प्रयत्न केला. (फोटो सौजन्य-अनुश्री फडणवीस/Reuters)
  भारतातील पहिल्या महिला फोटोग्राफर Homai Vyarawalla या अनुश्रीच्या आदर्श आहेत. अनुश्रीच्या मते महिला आणि पुरूष फोटोग्राफरमध्ये एवढाच फरक आहे की, त्यांच्याकडे लोकं कोणत्या नजरेने पाहतात. 'स्त्रियांशी वागण्याची पद्धत बदलली पाहिजे. आपण देवतांची पूजा करतो, मात्र जेव्हा खऱ्या आयुष्यातील महिलांना आदर देण्यात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यात मात्र आपण सपशेल हरतो,' अशी खंत देखील तिने व्यक्त केली. संपादन - जान्हवी भाटकर
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Pulitzer award

  पुढील बातम्या