News18 Lokmat

1 मेपासून पेट्रोल,डिझेलचे दर रोज बदलणार

आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील दरानुसार येत्या 1 मे पासून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये बदल होणार आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 12, 2017 04:15 PM IST

1 मेपासून पेट्रोल,डिझेलचे दर रोज बदलणार

12 एप्रिल : आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील दरानुसार येत्या 1 मे पासून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये बदल होणार आहे. आयओसी, भारत पेट्रोलियम लिमिटेड, हिंदुस्थान पेट्रोलियम लिमिटेड या सरकारी तेल कंपन्यांच्या मालकीचे जवळपास 58 हजार पेट्रोल पंप आहेत. येत्या 1 मे पासून निवडक पाच शहरांत नियमित पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये बदल होतील.

हा प्रयोग यशस्वी झाल्यास हळूहळू संपूर्ण देशात अंमलबजावणी सुरु होईल असं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं. आंध्र प्रदेशातील पुदूच्चेरी, विझाग, राजस्थानमधील उदयपूर, झारखंडमध्ये जमशेदपूर आणि चंदीगड या पाच शहरात प्रायोगिक तत्त्वावर दररोज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा आढावा घेतला जाईल. चाचणीसाठीच्या पाच शहरांमध्ये महाराष्ट्राचं एकही शहर नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2017 04:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...