मित्रांनी ग्रुप सेक्ससाठी केलं ब्लॅकमेल, 12वीच्या विद्यार्थिनीनं स्वतःला घेतलं पेटवून

मित्रांनी ग्रुप सेक्ससाठी केलं ब्लॅकमेल, 12वीच्या विद्यार्थिनीनं स्वतःला घेतलं पेटवून

मित्रांनीच मिळून एका 20 वर्षीय तरुणीला ग्रुप सेक्ससाठी ब्लॅकमेल (blackmailing)करण्याचा प्रयत्न केला. या त्रासाला कंटाळून तरुणीनं स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली.

  • Share this:

गांधीनगर, 12 ऑक्टोबर : मित्रांनीच मिळून एका 20 वर्षीय तरुणीला ग्रुप सेक्ससाठी ब्लॅकमेल (blackmailing)करण्याचा प्रयत्न केला. या त्रासाला कंटाळून तरुणीनं स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. पीडित तरुणीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचं नाव सोनल वोरा असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ही धक्कादायक घटना गुजरातमध्ये घडली आहे.

(पाहा :  VIDEO : धावत्या ट्रेनखाली गेला साप, पाहा पुढे काय घडलं...)

किसिंग व्हिडीओद्वारे केलं ब्लॅकमेल

मिळालेल्या माहितीनुसार, सोनलला ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपींची नावं जीतेंद्र मकवाणा, राहुल वोरा, अखिल परमार आणि गौरी उभाडिया अशी आहेत. काही दिवसांपूर्वी जीतेंद्रनं सोनलसोबत किसिंगचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. या व्हिडीओच्या आधारे जीतेंद्र तिला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप सोनलनं आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये केला आहे.

(वाचा :पत्नीच्या रोजच्या कटकटीला कंटाळला होता पती, पत्नीला संपवूून केली आत्महत्या)

किसिंगचा व्हिडीओ जीतेंद्रनं आपल्या मित्रांनादेखील दाखवल्याचं सोनलनं चिठ्ठीत नमूद केलं होतं. यानंतर त्याचे सर्व मित्र ग्रुप सेक्ससाठी सोनलला ब्लॅकमेल करू लागेल. पोलिसांनी आरोपी राहुल आणि गौरीच्या मुसक्या आवळल्या असून फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे. मृत्युमुखी पडलेली सोनल इयत्ता बारावीत शिकत होती. पोलिसांनी सांगितलं की, आईवडील कामानिमित्त घरातून बाहेर पडल्यानंतर सोनलनं आत्महत्या केली.

(वाचा : हँडसम चोरटा : मॉडेलिंगसाठी आला होता चंदेरी दुनियेत; पोहोचला तुरुंगात)

SPECIAL REPORT: ठाण्यातील 'हा' रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2019 04:46 PM IST

ताज्या बातम्या