काँग्रेसच्या पहिल्या यादीनंतर आता महाराष्ट्राचा नंबर...आजच्या 5 मोठ्या बातम्या

काँग्रेसच्या पहिल्या यादीनंतर आता महाराष्ट्राचा नंबर...आजच्या 5 मोठ्या बातम्या

दिवसभरातील या सगळ्यात महत्त्वाच्या 5 बातम्यांकडे देशाचं लक्ष असणार आहे.

  • Share this:

जागतिक महिला दिन

08 मार्च हा दिवस सर्वत्र जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे स्त्रीच्या कार्याला आणि त्यांच्या कर्तुत्वाला न्यूज18 लोकमतचा सलाम. या महत्त्वाच्या दिनी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. तर सगळ्यात अभिमानाची आणि महत्त्वाची बाब म्हणजे आजच्या या जागतिक महिला दिनी महाराष्ट्रातील 6 महिलांना सगळ्यात मानाचा 'नारी शक्ती पुरस्कार' प्रदान करण्यात येणार.

अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात निर्णय

सगळ्यांसाठी महत्त्वाच्या अशा दिल्ली अयोध्या प्रकरणी शुक्रवारी सुप्रीम कोर्टात निर्णय देण्यात येणार आहे. अयोध्या प्रकरणात मध्यस्थ नेमावा किंवा नाही यावर आदेश देण्यात येणार आहे. दरम्यान, सकाळी साडेदहाच्या सुमारास आदेश येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्या अध्यक्षतेखालील घटनात्मक खंडपीठ निर्णय देणार आहे. त्यामुळे शुक्रवारच्या या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

राहुल गांधी गोव्याच्या दौऱ्यावर

काही दिवसांवर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून सज्ज झाले आहेत. त्यासाठी सभा आणि प्रचारांच्या फैरी सुरू आहेत. यातच शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे गाेव्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पहिल्या 15 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचंही नाव आहे. शुक्रवारी राहुल गांधी यांच्या गोव्यातील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे. त्यामुळे ते काय बोलणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष असणार आहे.

काँग्रेसच्या पहिल्या यादीनंतर आता महाराष्ट्राचा नंबर

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 15 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली आहे. या यादीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचाही समावेश आहे. परंतु, या 15 जणांच्या यादीत महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याचा समावेश नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी महाराष्ट्रातील 26 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानंतर यादी प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये महाराष्ट्रातून कोणते उमेदवार रिंगणात उतरणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे.

नीरव मोदीचा आलिशान बंगला होणार जमिनदोस्त

डायमंड किंग नीरव मोदीच्या महाराष्ट्रातील अलीबागमधील बंगला हा जमिनदोस्त करण्यात येणार आहे. 13 हजार कोटींचा पीएनबी घोटाळा केलेला आरोपी नीरव मोदीच्या बंगल्याला अखेर प्रशासनाकडून सुरुंग लावण्यात येणार आहे. हा बंगला खूप पक्का असल्याने त्याला डायनामाइटने पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

First published: March 8, 2019, 6:20 AM IST
Tags: friday

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading