श्रीलंकेत पुन्हा तीन बॉम्बस्फोट, देशभर पोलिसांचं छापासत्र

श्रीलंकेत पुन्हा तीन बॉम्बस्फोट, देशभर पोलिसांचं छापासत्र

पोलिसांच्या छाप्यात ISISशी संबंधित आक्षेपार्ह साहित्य आढळून आलं. स्फोटकांचं साहित्यही जप्त केलं.

  • Share this:

कोलंबो 26 एप्रिल : श्रीलंकेत सर्व देशभर पोलिसांचं छापासत्र सुरू असतानाच शुक्रवारी पुन्हा तीन बॉम्बस्फोट झाल्याचं वृत्त ANI ने दिलं आहे. कलमुनायी या शहरात हे स्फोट झाले मात्र त्यात मोठी हानी झालेली नाही. याआधी रविवारी झालेल्या स्फोटात 250 जणांचा मृत्यू झाला होता. दिवसभरात आठ आत्मघातकी बॉम्बस्फोट झाले होते.

पोलिसांनी आज दिवसभर अनेक शहरांमध्ये छापे टाकून तपासणी केली. त्यात ISIS या दहशतवादी संघटनेचे झेंडे, 150 डिटोनेटर्स, 1 लाख बॉल बेअरिंग, ड्रोन कॅमेरा अशी सामुग्री सापडल्याची माहिती सीएनएन ने दिली आहे. तर अनेक संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

बॉम्बस्फोटांच पाकिस्तानी कनेक्शन

श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटांबद्दल दररोज नव नवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात श्रीलंका पोलिसांनी 9 पाकिस्तानी नागरिकांना अटक केलीय. देशातल्या विविध भागातून या लोकांना अटक करण्यात आली आहे. याच लोकांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

त्यांनी साहित्य आणि पैसा पुरविल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व लोकांची वेगवेगळी चौकशी करण्यात येत आहे. श्रीलंकेचे मंत्री लक्ष्मण किरियेल्ला यांनी आपल्याच सुरक्षा संस्थांवर आरोप केले आहेत. भारताने घातपाताची शक्यता असल्याची सूचना दिली होती मात्र गुप्तचर संस्थांनी त्यावर कारवाई केली नाही असंही ते म्हणाले.

या स्फोटाचा तपास एक खास टीम करत असून त्यात अनेक धक्कादाक गोष्टी बाहेर येत आहेत. याच खास पथकाने ही अटकेची कारवाई केली.  कोलंबोतल्या ज्या दोन अलिशान हॉटेलमध्ये स्फोट झाले ते स्फोट दोन भावांनी घडवले असून ते श्रीलंकेतल्या एका मोठ्या कोट्यशीध व्यापाऱ्यांची मुलं असल्याचं वृत्त AFPने दिलं आहे. एका आरोपीच्या बायकोने स्वत:सह आपल्या दोन लहान मुलांनाही बॉम्ब स्फोटाने उडवून दिलं होतं अशी धक्कादायक माहितीही सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे.

रविवारी ईस्टरच्या दिवशी श्रीलंकेत झालेल्या विविध आठ आत्मघातकी बॉम्ब स्फोटांमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या 250 वर पोहोचली आहे. त्यात 34 विदेशी नागरिक होते. तर 500 जण जखमी झाले होते.

First published: April 26, 2019, 11:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading