शत्रूराष्ट्रांच्या उपग्रहांना टक्कर देणाऱ्या 'मिशन शक्ती'बद्दल विचारले जात आहेत 'हे' प्रश्न

शत्रूराष्ट्रांच्या उपग्रहांना टक्कर देणाऱ्या 'मिशन शक्ती'बद्दल विचारले जात आहेत 'हे' प्रश्न

नेमके कोणते प्रश्न विचारण्यात येत आहेत?

  • Share this:

नवी दिल्ली 27 मार्च: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी(27 मार्च) अँटी सॅटलाईट क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाल्याची माहिती देशवासीयांना दिली. हे क्षेपणास्त्र संपूर्ण स्वदेशी बनावटीचं आहे. जमिनीवरून पृथ्वीच्या कक्षेत सुमारे 300 किमीवरील उपग्रह फक्त 3 मिनिटांत अचूक नेम साधून शत्रू देशाच्या उपग्रहाला उद्ध्वस्त करू शकतं. अशा स्वरुपाचं तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा जगातील चौथा देश आहे. 2010पासून DRDO आणि ISROच्या संयुक्त कामगिरीला यश मिळालं आहे.

मिशन शक्ती नेमकं काय आहे?

भारताने 27 मार्चला ओडिसा येथील  डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम बेटावरून अँटी सॅटलाईट क्षेपणास्त्राची चाचणी केली. ही चाचणी DRDO साठी तांत्रिक आव्हान होतं. मात्र ते आव्हान यशस्वीपणे DRDOने पार पाडलं. चाचणी करताना महत्त्वाचं होतं ते म्हणजे क्षेपणास्त्र जमिनीवरून अंतराळातील उपग्रहावर मारा करणारं असल्यानं पृथ्वीच्या सुमारे 300 किलोमीटर कक्षेत येणारा उपग्रह अचूकपणे कमी वेळेत निकामी करणं. DRDO ने केलेल्या नियोजनानुसार ‘मिशन शक्ती’ अर्थात पृथ्वीच्या 300 किमी कक्षेत आलेला उपग्रह अवघ्या 3 मिनिटांत उद्ध्वस्त करून देशानं नवीन इतिहास रचला आहे.

चाचणीनंतर उपग्रहाचं अंतराळात काय होईल?

या चाचणीनंतर निकामी झालेल्या उपग्रहाचे आणि क्षेपणास्त्राचे तुकडे कदाचित अंतराळातील इतर उपग्रहांना किंवा अंतराळयानाच्या मार्गातील अडथळे ठरू शकतात. उपग्रहाचे तुकडे इतर ग्रहांच्या किंवा पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर ते जमिनीवर पडतील. त्यापासून पर्यावरणाचं कुठलंही नुकसान होणार नाही.

ASAT चाचणी भारतासाठी का महत्त्वाची?

भारताची अंतराळातील कामगिरी ही अभिमानास्पद आणि तांत्रिकदृष्ट्या अतिशय सक्षम आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये भारतानं मंगळावर उपग्रह, निरीक्षण करणारे, प्रायोगिक उपग्रहही पाठवले आहेत. 2014 पासून भारतानं ‘मिशन शक्ती’ मोहीम हाती घेतली होती. ASAT चाचणीमुळे शत्रू राष्ट्रांना आपण किती सक्षम आहोत हे दाखवून दिलं आहे. त्यामुळे शत्रू राष्ट्र उपग्रहाद्वारे भारताची माहिती किंवा भारताच्या उपग्रहावर कुरघोडी करताना विचार करेल हे नक्की. ही चाचणी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे.

अवकाशातील शस्त्रास्त्र युद्धात आता भारतही?

भारतानं ASAT ची यशस्वी चाचणी केली. मात्र कुठल्याही देशाचं विनाकारण नुकसान न करण्याचा भारताचा इरादा आहे. यामध्ये आंतराष्ट्रीय कराराचं उल्लंघन न करता भारतानं ही चाचणी केली आहे. अवकाशात युद्ध झाल्यास भारत सहभागी होणार नाही. भारताचा प्रयत्न युद्धजन्य परिस्थिती निर्माण करणं नाही, तर शांतता प्रस्थापित करण्याचा आहे. ही चाचणी मात्र त्या शत्रू राष्ट्रांना दिलेला संदेश आहे. भारतात गुप्तमार्गानं हेरगिरी केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

आवकाशातील शस्त्रांच्या सुरक्षेबाबत आंतरराष्ट्रीय कायदा काय?

10 ऑक्टोबर 1967 साली Outer Space Treaty नावाचा एक करार करण्यात आला. या करारानुसार अवकाशात कुठल्याही राष्ट्राकडून क्षेपणास्त्र कोणत्याही कारणासाठी तैनात केली जाणार नाही. या करारावर 2019पर्यंत एकूण 108 देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. 18 जानेवारी 1982 साली भारतानं या आंतरराष्ट्रीय करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार सामूहिक विनाश करणाऱ्या क्षेपणास्त्रांवर प्रतिबंध लावण्यात आले आहेत. भारतानं या कराराचं उल्लंघन न करता आपली चाचणी यशस्वीपणे पार पाडली.

ASAT क्षेपणास्त्राची चाचणी कोणाविरोधात?

DRDO ने  ASAT क्षेपणास्त्राची चाचणी कुठल्याही देशाविरोधात केलेली नाही. मात्र तरीही पाकिस्तानचा जळफळाट होत असल्याची माहिती मिळत आहे. भारताच्या अवकाशातील क्षमता वाढवणं आणि संरक्षण या दोन महत्त्वपूर्ण उद्देशानं ही चाचणी करण्यात आली आहे.

VIDEO : प्रीतम मुंडेंच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला म्हणून बेदम मारहाण

First published: March 27, 2019, 9:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading