नवी दिल्ली 15 जानेवारी : सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेबसाइट www.narendramodi.in ही सुरक्षित नसल्याची महिती पुढं आलीय. फ्रान्सच्या एका हॅकरनेच ही माहिती ट्विटरवर जाहीर केलीय. या वेबसाईटसाठी काम करणारी टीम ही आता त्यातल्या तृटी दूर करण्याचं काम करत आहे.
नरेंद्र मोदींची ही वेबसाइट त्यांची वयक्तिक वेबसाईट आहे. पंतप्रधान त्यावर सरकारची माहिती, फोटो, लेख, व्हिडीओ अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्यावर अपलोड करत असतात. त्यामुळं तांत्रिकदृष्ट्याही ही वेबसाईट सक्षम असणं गरजेचं आहे.
Hi @narendramodi,
— Elliot Alderson (@fs0c131y) January 14, 2019
A security issue has been detected on your website. An anonymous source uploaded a txt file containing my name on your websites in realtime. He also have a full access to your database. You should contact me in private and start a security audit ASAP!
Regards, pic.twitter.com/AuDupzRlrL
फ्रान्सचं तंत्रज्ञ आणि एथिकल हॅकर इलियट एंडरसन यांनी हा दावा केला आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटलंय की, "हाय @narendramodi, तुमच्या वेबसाईटमध्ये काही तांत्रिक काही त्रुटी आढळल्या आहेत. एका अज्ञात सोर्सने माझ्या नावाने एक फाइल तुमच्या वेबसाईटवर अपलोड केली आहे. त्याच्याकडे तुमच्या वेबसईटच्या डेटाबेसचाही अॅक्सेस आहे. तुम्ही तातडीने माझ्याशी संपर्क साधा आणि वेबसाईटला सुरक्षीत करा."
एंडरसन यांच्या या ट्विट नंतर http://narendramodi.in या वेबसाईटच्या टीमने त्यांच्याशी संपर्क साधल्याची माहितीही त्याने दिली आहे. ही वेबसाईट तांत्रिदृष्ट्या कशी सक्षम करता येईल यावर करत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
या वेबसाईटवर प्रचंड माहिती आणि डेटा आहे. पंतप्रधानांची वेबसाईट जर हॅक झाली तर तर त्याचा देशाच्या प्रतिमेवरच परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर सरकारच्या सर्वच विभागांच्या वेबसाईटवर महत्त्वाची माहिती सतत अपलोड होत असते. त्याची सुरक्षीतताही अतिशय महत्त्वाची आहे.
या घटनेनंतर सरकार आपल्या सर्वच वेबसाईट्ची सुरक्षीतता आणखी बळकट करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
धारावीत रंगला पोंगलचा अविस्मरणीय सोहळा; पहा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.